पान:सभाशास्त्र.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५३ सभानियमन व संचालन -

  • *-*-*-*-*-*-*-********
          • -

सभातहकुबीची होऊन विषय डावलला जातो. कारण चर्चातहकुबी झाली की सभेपुढील कार्यक्रम-पत्रिका वलास होते व सभा संपते. नवीन सभा मंग बोलवावी लागते. व पुन्हा नोटीस वगैरे सर्व आन्हिक करावे लागते. कारण सभा संपली म्हणजे तहकूब झालेला विषय गळला असा परिणाम होतो. म्हणून चर्चातहकुबीचा असा परिणाम होणार असेल तर कित्येक संस्थांच्या नियमांत अध्यक्षाला ती न घेण्याचा अधिकार आहे. निदान अशी वस्तुस्थिति असेल तेथे अध्यक्षाने काय परिणाम होईल याची कल्पना सभेस जरूर करून द्यावी व आणलेली सूचना नियमाचा दुरुपयोग करण्याकरतां आणली असेल अशी खाली झाल्यास ती मांडण्यास परवानगी देऊ नये व असे करणे अयोग्य नाहीं. कांहीं प्रसंगीं चर्चा चालू असतां अनेक कायद्याचे प्रश्न व आक्षेप सभासंचालनाचे दृष्टीने उत्पन्न होतात व त्यामुळे थोडा काळ चर्चेत अडथळा उत्पन्न होतो. पुष्कळ वेळां निर्हेतुकपणे ही गोष्ट होते; तथापि अनेक प्रसंगी कांहीं तरी क्षुद्र व क्षुल्लक आक्षेप घेऊन सभाकायत, चालू चर्चेत अडथळा सहेतुक उत्पन्न केला जातो. तसेच सभेत सभासद् गैराशस्त वागतो, अध्यक्षास जुमानत नाहीं, गडबड उडते व याहीमुळे सभाकायत व्यत्यय येतो. अडथळा दूर होतांच चर्चा चालू करणे हे अध्यक्षाचे कर्तव्य आहे. चर्चेचा शेवट मत घेण्यांत झाला पाहिजे व मत घेण्याचे ठरले म्हणजे व मतमोजणी सुरू झाली म्हणजे चर्चातहकुबी अगर सभातहकुबी अगर पूर्वप्रश्न काहीही मांडतां येणार नाहीं. चर्चाबंदीः- (closure ) चर्चेचा समाति आपोआप अगर चर्चाबंदीने होते. चर्चेत कोणी भाग घेत नाही असे झाले म्हणजे ठराव मांडणारास अध्यक्ष उत्तर देण्यास सांगतो व त्यानंतर प्रश्न मतास टाकला जातो. ही चर्चेची समाप्ति आपोआप झाली असे मानले जाते. परंतु चर्चेत भाग घेण्यास सभासद तयार आहेत, चर्चा चालू राहावी अशी अनेकांची इच्छा असतां जेव्हां चर्चाबंदीची सूचना येऊन ती पास होते तेव्हां चर्चा बंद होऊन प्रश्न मतास टाकला जातो. या परिस्थितींत बंद झालेली चर्चा जाणून बुजून बंद केलेली असते. चर्चाबंदीचे सूचनेनें सभेला चर्चा बंद करणे भाग पडते. सभेत भाग घेण्याचा प्रत्येक सभासदाला हक्क आहे. तथापि, भाषणाला व्यक्तिशः, चर्चेला सामुदायिक दृष्टीने, व सभेला सोईचे दृष्टीने काही तरी कालमर्यादा