पान:सभाशास्त्र.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र १५२

  • ==**********

बैठकीचे शेवटचे दोन तास चर्चेसाठी येते. पास झाल्यास सभा तहकूब होते. नापास झाल्यास व सभेचा काल शिल्लक असल्यास खंडित झालेल्या विषयाचे चर्चेस सुरवात होते. तात्पर्य ही सूचना आली की चालू चर्चा तहकूब होते. तिला अडथळा उत्पन्न होतो. असली सूचना आणण्याचा उद्देश विशिष्ट विषयावर सरकारचे लक्ष वेधणें अगर त्या बाबतच्या सरकारी धोरणाचा निषेध करणे हा असतो. सभेचे चालू काम बंद पाडणे हा नसतो.. पण तसा थोडासा परिणाम मात्र होतो. पुष्कळ संस्थांच्या नियमांतून सभाकाल ठरलेला असतो. तो काल संपतांच त्या दिवसापुरतें सभेचे काम संपते. मध्यवर्ति विधिमंडळांत बैठक सकाळी ११ ते संध्याकाळी ५ पर्यंत असते. त्यापुढे सहसा बैठक नसते. त्यानंतर चालू ठेवणे झाल्यास सभेची साधारण संमति घेण्यात येते. वेळ संपतच चर्चा तहकूब होते. व नियमाप्रमाणे दुस-या दिवशीं अगर अन्य दिवशी पुढे चर्चा चालू होते. जेथे बैठक केव्हां संपवावी असा नियम असेल तेथे त्या वेळी ती सामान्यतः संपते व त्यामुळे चर्चेला अडथळा उत्पन्न होऊन ती थांबते. अर्थात् हा अडथळा नियमाप्रमाणे पण निर्हेतुक असतो. | चर्चातहकुबीः—नियमाप्रमाणे वारंवार सभातहकुबी आणून आणलेला अडथळा हा सहेतुक असतो हे वर सांगितलेच आहे. तसेच चर्चातहकुबीची सूचनाही वारंवार आणून चर्चेला अडथळा उत्पन्न करता येतो. चर्चातहकुबीचे सूचनेला समातहकुबीचे नियम व मर्यादा लागू आहेत. कांहीं विधिमंडळाचे नियमांत एका विषयावर अगर प्रश्नावर चर्चा चालू असतां फक्त एकदांच चर्चातहकुबी आणता येते. मध्यवर्ति विधिमंडळांत एकाच प्रश्नाचे चर्चेत एकापेक्षा अधिक वेळां चर्चातहकुबी आणतां येते. मात्र दोहोंत योग्य काल जावा लागतो. तथापि चर्चातहकुबी तेथे हक्काने मांडतां येत नाहीं. ती मांडू देण्यास परवानगी देणे न देणे हे सर्वस्व अध्यक्षाचे मर्जीवर (discretion ) आहे. चर्चातहकुबी म्हणजे चालू चर्चा त्या प्रसंगी संपू नये हा हेतु असतो. अजीबात चर्चा होऊ नये अगर प्रश्नाचा निर्णय होऊ नये असा तिचा हेतु नसतो. तथापि पुष्कळ वेळां सहेतूचा विपर्यास होऊन चचतहकुबी ही प्रश्न डावलणारी, चर्चेस अडथळा उत्पन्न करणारी ठरते. कार्यक्रमपत्रिकेवरील चर्चित विषयानंतरचे प्रश्न विवाद्य नसतील अगर कांही विषयच त्यानंतर कार्यक्रम-पत्रिकेवर नसेल तर.चर्चातहकुबीची सूचना वस्तुतः