पान:सभाशास्त्र.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र १५ ० मतास घालू नये असा सभेचा निर्णय आहे म्हणून तो सभेपुढे रहात नाहीं व तो डावलला जातो. पूर्वप्रश्न मांडून प्रश्न डावलण्याचा प्रघात या देशांत विशेष नाहीं. सभातहकुबीचा उपयोग विशेष करण्यात येतो. येथील विधिमंडळांत अगर विधिसिद्ध संस्थांच्या नियमांत पूर्वप्रश्नाला स्थान नाहीं, तसा संकेतही नाही. तथापि इच्छासिद्ध संस्थांच्या सभेत त्याविरुद्ध नियम नसल्यास पूर्वप्रश्न मांडण्यास हरकत नसावी. डावलणारी उपसूचनाः–सभेपुढील प्रश्न. डावलण्याची आणखी एक रीत म्हणजे प्रश्न डावलणारी उपसूचना आणून सभेपुढील प्रश्नावर सभेचे मत घेणे अशक्य करणे. असल्या उपसूचनांचा उद्देशच आमूलाग्र फरक सुचविणारी भाषा उपसूचनेत घालून सभेपुढील प्रश्नावर मत देणे अशक्य करण्याचा असतो. असल्या उपसूचनेने मूळ व मुख्य विषय बाजुस पडून दुस-याच व विरोधीही विषयावर सभेचे मतप्रदर्शन होते. सर्वसाधारण उपसूचना या मुख्य प्रश्नाला धरून असतात. ही उपसूचना वरून कशीही दिसत असली तरी वस्तुतः तशी नसते. सभेपुढील प्रश्नाचे सुरवातीचे शब्द ठेवून बाकी सर्व शब्द काढून त्या जागी दुसरे शब्द घालून ही उपसूचना आणली जाते. या सभेचे असे मत आहे कीं, मंत्रिमंडळ दूर करून देशावर राजेसाहेब यांनी उपकार केले आहेत व त्याबद्दल ही सभा त्यांचे आभार मानीत आहे” या सूचनेवर ६ ‘या सभेचे असे मत आहे की यापुढील सर्व शब्द गाळून त्या जागी पुढील शब्द घालावेत : मंत्रिमंडळाने ऋणविमोचन, कुळकायदा वगैरे कायदे करून देशाची योग्य ती सेवा केली आहे ?' अशी उपसूचना आली म्हणजे मूळ प्रश्न पूर्णपणे डावलला जाऊन उपसूचनेतील विषयावर मतप्रदर्शन होते. अशी उपसूचना पास झाली म्हणजे पुन्हा मूळ ठरावांतील न गाळलेले शब्द व ही उपसूचना मिळून तयार झालेला ठराव अगर सूचना मतास घातली जाते व अशा रीतीने अगदी नवीन विषयावर मतप्रदर्शन होऊन मूळ विषय डावलला जातो. ६ राष्ट्रसंघाच्या कांचकारखान्यांतील मजुराबाबतच्या शिफारशीवर या सभागृहाने विचार केला असून कांचेच्या कारखान्यांतील मजुरांचे कामासंबंधीच्या शिफारसीला हे सभागृह मान्यता देत नाही ? या ठरावाला ८ ‘विचार केला असून यापुढील-सर्व शब्द गाळावेत व त्याऐवजी पुढील शब्द घालावेत : हे सभागृह त्यांना मान्यता देत असून आवश्यक ते कायदे सरकारने करून ते अंमलात आणावेत अशी विनंति करीत आहे, अशी उपसूचना आली