पान:सभाशास्त्र.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ ४९ सभानियमन व संचालन त्यावर मते घ्यावयाची किंवा नाही हा प्रश्न या सूचनेने उपस्थित होतो, म्हणून या सूचनेला पूर्वप्रश्नाची सूचना म्हणतात. - पूर्वप्रश्न मांडणेः–अध्यक्षाने सभेपुढील प्रश्न रीतसर चर्चेस घालतांच अगर त्यानंतर केव्हाही पूर्व प्रश्नाची सूचना मांडतां येते. चर्चाबंदी झाली अगर प्रश्न मतास घातला असेल तर मात्र ही सूचना आणतां येत नाहीं. कारण सभेनें प्रश्नावर निर्णय घ्यावयाचा आहे असे आधीच ठरविले असतें. अगर निर्णय घेण्याचे, मत घेण्याचे काम चालू असते. तसेच उपसूचनेवर वादविवाद चालू असतां पूर्वप्रश्न मांडतां येणार नाहीं. उपसूचना पास झाली अगर नापास झाली अगर परत घेतली गेली म्हणजे तिचा निकाल लागतांच पूर्वप्रश्न मांडतां येतो. उपसूचना पास झाली असेल तर दुरुस्त ठरावाला तो पूर्वप्रश्न होतो व तो पास झाल्यास दुरुस्त ठराव डावलला जातो. बिलाचे वादविवादांतही वरील मर्यादा लक्षात ठेवून पूर्वप्रश्न मांडतां येतो. समित्यांच्या सभेत पूर्वप्रश्न मांडतां येत नाही. त्याचप्रमाणे सभेपुढील कार्यक्रम ठरविण्याबाबतच्या सूचनेवर पूर्वप्रश्नाची सुचना देता येत नाहीं. पूर्वप्रश्नाच्या सूचनेला उपसूचना आणतां येत नाही. तथापि पूर्वप्रश्नाची सूचना व सभातहकुबीची सूचना दोन्ही अध्यक्षाकडे आल्या असतां अध्यक्षाने सभातहकुबीला अग्रक्रम दिला पाहिजे. सभातहकुबीनें पूर्वप्रश्नच डावलला जातो. किंबहुना समातहकुबचे सूचनेत तो लुप्त होतो. पूर्वप्रश्नाची सूचना ‘सभेपुढील प्रश्न आतां मतास घालू नये' अशा स्वरूपांत असते. अनेक वेळा ‘सभेपुढील प्रश्न आतां मतास घालावा' अशाही स्वरूपाची असते. तथापि पहिल्या स्वरूपांत बहुशः आणली जाते. कॉमन्स सभेत त्याच स्वरूपांत आणतां येते. “सभेपुढील प्रश्न आता मतास घालू नये' ही सूचना पास झाल्यास सभेपुढील प्रश्न डावलला जातो व त्या सभेत अगर त्या दिवशीं जसा नियम असेल त्याप्रमाणे पुन्हा तो सभेपुढे येऊ शकत नाही. ही सूचना नापास झाल्यास सभेपुढील प्रश्न अध्यक्षाने ताबडतोब मतासच घातला पाहिजे. कारण सूचना नापास झाल्याने सभेचा निर्णय प्रश्न आता मतास घालावा असा होतो. मग प्रश्नावर चर्चा नाहीं, भाषणें नाहींत, उपसूचना नाहींत, तो एकदम मतास घातलाच पाहिजे, ‘सभेपुढील प्रश्न आतां मतास घालावा' ही पूर्वप्रश्नाची सूचना पास झाल्यास तोच परिणाम होतो व प्रश्नावर एकदम मत घेतलेच पाहिजे. ही सूचना नापास झाल्यास प्रश्न आतां