पान:सभाशास्त्र.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र ११८ असे वाटते त्यांनी पहिलीला विरोध करून दुसरीला, जर त्यांचा फक्त चर्चा पुढे ढकलावी एवढाच हेतु असेल तर, पाठिंबा दिला पाहिजे. त्याच बैठकीत चर्चा पुरी व्हावी असा हेतु असेल तर दोन्हीला विरोध केला पाहिजे, चर्चातहकुबी म्हणजे त्या दिवशी चर्चा सुरू होऊ नये अगर पुरी होऊ नये एवढ्याच उद्देशाने आणली जाते, तींत प्रश्न डावलण्याचा उद्देश नसतो. चर्चातहकुबीचे सूचनेला ‘अमुक दिवसपर्यंत' अशी उपसूचना योग्य ठरते. किंबहुना मूळ सूचनेंतसुद्धां कालनिर्देश करता येतो, व बहुशः करतातही. कित्येक संस्थांचे नियमांत विकल्याने दोन सूचना अगर उपसूचना एकवटून अगर एकाच वेळीं मांडता येत नाहीत. पृथक्पणे मांडल्या पाहिजेत असा नियम असतो व अनेक दृष्टीनीं तो इष्ट आहे. विकल्पाने मांडलेल्या सूचनेने अनेक वेळां सभासदांचे. मनांत गोंधळ उत्पन्न होतो, पृथक् मांडण्याने वेळ अधिक जातो. पण सुलभता अधिक उत्पन्न होते. काय चालले आहे. याचा अधिक उलगडा सभासदांना होतो. पूर्वप्रश्नः- प्रश्न डावलण्याची दुसरी रीत म्हणजे पूर्वप्रश्नाची सूचना मांडणें ही होय. पूर्व प्रश्नाच्या सूचनेचा (to move previous question) उद्देश सभेपुढील प्रश्नावर सभेने निर्णय घेऊ नये हा असतो. सभातहकुबीन सर्वं सभा खंडित होते व त्याबरोबर सभेपुढे आलेला अगर येणारा प्रश्नही आपोआप खंडित होतो, डावलला जातो व तोच उद्देश त्या तहकुबीचा असतो. पूर्व प्रश्नाचा उद्देशही तसाच असतो. मात्र पूर्वप्रश्नाची सूचना पास झाल्यास सभेपुढील असलेला प्रश्नच फक्त डावलला जातो. सभा बंद होत नाही. दुसरा विषय सभेपुढे येऊ शकतो. दुसरा विषय सभेपुढील प्रश्न होऊन आला म्हणजे पुन्हा त्याबाबत पूर्वप्रश्नाची सूचना अर्थात् करता येते. जेव्हा एखादा विषय सूचनारूपाने नियमानुसार सभेपुढे येतो, सभेपुढील प्रश्न होतो, तेव्हांच पूर्वप्रश्नांची सूचना मांडता येते. म्हणून अध्यक्षाने अमुक प्रश्न आतां सभेपुढे चर्चेस आहे असे सांगितल्याशिवाय पूर्व प्रश्नांची सूचना मांडतां येत नाही. अध्यक्ष स्थानापन्न झाल्याबरोबर पूर्व प्रश्नांची सूचना मांडता येत नाही. कारण त्या वेळी सभेपुढे प्रश्न नसतो. प्रश्न सभेपुढे रीतसर आला म्हणजे पूर्वप्रश्न मांडतां येतो. पूर्वप्रश्न म्हणजे ‘सभेपुढील प्रश्न आतां मतास घालू नये' ही सूचना होय. सभेपुढील प्रश्नाचा निकाल अगर निर्णय सभेने घ्यावा किंवा नाहीं हैं या सूचनेमुळे सभेला निश्चित करणे भाग पडते. मुख्य प्रश्नाचे आधा