पान:सभाशास्त्र.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४७ सभानियमन व संचालन

वेळां सभेपुढे कांहींही प्रश्न येण्यापूर्वी असली तहकुबीची सूचना मांडली जाते. अध्यक्ष स्थानापन्न होतांच सभातहकुबाची सूचना मांडणारा उभा राहतो व अध्यक्षाला ती तशी सूचना मांडावयाची आहे असे सांगतो. अध्यक्षाने परवानगी दिली पाहिजे. तहकुबीची सूचना पास झाल्यास सभा बिनमुदत तहकूव होते. पुन्हा नोटीस देऊन सभा काढावी लागते. अशा रीतीनें सभेपुढील प्रश्न अगर सर्व कार्यक्रमपत्रिका डावलली जाते. बिनमुदत सभातहकुबीची सूचना सभेचे सुरवातीस अगर चर्चा सुरू झाल्यानंतर केव्हाही मांडतां येते. इतकेच नव्हे तर एकदा नापास झाल्यास वारंवार त्या सभेत मांडतां येते. मात्र असल्या दोन सूचनेत कांहीं काळ जावा असा सर्वन नियम असतो. नियम नसेल तेथे अर्ध्या तासाचा काल आवश्यक मानावा. पहिल्या तहकुबीचे सूचनेवर चर्चा होऊ द्यावी. नंतरच्या सूचना निव्वळ मांडू द्याव्यात व लागलीच मतास घालाव्यात. चर्चाबंदीची (closure ) सूचना पास झाल्यानंतर सभातहकुबीची सूचना त्या प्रश्नावरील मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईपंर्यंत मांडता येणार नाही. कारण सभेने मते घ्यावीत व विषयाचा निकाल करावा हा निर्णय घेतलेला असतो, तो मग विफल होतो. त्याचप्रमाणे प्रश्न मतास घातल्यापासून मतमोजणी होऊन अध्यक्ष निर्णय जाहीर करीपर्यंत तहकुबीची सूचना मांडता येणार नाही. तसेच सभेने अमुक काळपर्यंत काम करावयाचे असा खास निर्णय सभेने सुरवातीस घेतला असल्यास सभातहकुबीची सूचना मोडतां येणार नाही. तसेच अध्यक्षाने ‘अमुक दिवसांपर्यंत चर्चा अगर सभा तहकुब व्हावी' ही सूचना मांडली असतां, मोघम सभा तहकुंबीची सूचना मांडतां येणार नाहीं. हे अपवाद वगळल्यास सभातहरूबीची सूचना केव्हाही करता येते, व ती येतांच तिला अध्यक्षानें अग्रक्रम दिला पाहिजे. बिनमुदत सभातहकुबीचा उद्देश प्रश्नाची चर्चा होऊ नये, तो डावलला जावा हा असतो. म्हणून असली सूचना आली असतां अमुक तारखेपर्यंत सभा तहकूब करावी ही उपसूचना गैर ठरते. तसेच बिनमुदत सभातहकबीच्या सूचनेला चर्चा तहकूब करावी हीही उपसूचना त्याच कारणाकरतां गैरलागू ठरते. पुष्कळ वेळां सभातहकुबीची सूचना व चर्चा तहकुबीची सूचना विकल्पाने मांडण्यात येतात. “आतां सभा अगर चर्चा तहकूब करावी अशी सूचना मांडण्यांत येते. तथापि मतास घालतांना त्या प्रथक करूनच अतास घालण्यात येतात. ज्यांना मूळ प्रश्न डावलला जाऊ नये