पान:सभाशास्त्र.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र १४६ परत घेता येणार नाहीं. परत घेण्यास सभेने वर सांगितल्याप्रमाणे परवानगी दिली म्हणजे त्या विषयावर सभेने निर्णय दिला नाही असा अर्थ होतो व पुन्हा तोच विषय सभेपुढे आणता येतो. या दृष्टीने अनेक वेळां परवानगी नाकारणे इष्ट ठरते. कारण विषय हातावेगळा होतो. प्रथम सूचना व नंतर उपसूचना सभेपुढील प्रश्न झाल्यानंतर, उपसूचनेचा कांहीं तरी निकाल लागल्याशिवाय मूळ सूचना परत घेण्याची विनंति अध्यक्षाने सभेपुढे मांडू नये. उपसूचना ही सभेपुढील प्रश्न असतो व त्याचा निकाल लागल्याशिवाय सूचनेच्या प्रश्नाचा निकाल लागू शकत नाही. म्हणून उपसूचना परत घेतली जाऊन, नापास होऊन अगर पास होऊन निकाली लागल्याशिवाय मूळ सूचना परत घेता येणार नाही. उपसूचना पास झाली तर दुरुस्त सूचना परत घेण्याची परवानगी सूचना मांडणाराने मागितली पाहिजे. सभेने न दिल्यास दुरुस्त सूचना अध्यक्षाने मताला घालून निकाल करावा. प्रश्न डावलणे:-सभेपुढील प्रश्न अनेक रीतींनी डावलतां येतो. अध्यक्षाने रीतसर प्रश्न चर्चेस घालतांच सभातहकुबाची सूचना आणून विषय डावलतां येतो. ही संभातहकुबीची सूचना सभेपुढील प्रश्नाला उपसूचना म्हणून नसते. ही स्वतंत्र सूचना असते. बोलणान्या वक्त्याचे भाषण संपताच ही आणतां येते. भाषण चालू असतां अडथळा करून ही सूचना आणता येत नाही. भाषण संपतांच सूचना आणू इच्छिणाराने उभे राहावे व ‘सभातहकुबी मांडावयाची आहे असे अध्यक्षास सांगावें. । सभातहकुबीः--सभातकुबीची सूचना येतांच तिला अध्यक्षानें अग्रक्रम दिला पाहिजे म्हणजे ताबडतोब चर्चित विषय तसाच ठेवून मांडण्यास परवानगी दिली पाहिजे. आतां सभा तहकूब व्हावी एवढीच ती सूचना असावी, तहकुबीची कारणे सूचनेत समाविष्ट करणे अयोग्य आहे. ती भाषणांत सांगणे योग्य आहे. या तहकुबीच्या सूचनेवरील चर्चेत ज्याने मुख्य प्रश्न मांडला आहे त्याला भाग घेण्याचा अधिकार आहे. पहिल्या तहकुबीच्या सूचनेवर योग्य चर्चा होऊ देणे इष्ट आहे व तीवर भाषणे पण करण्यास परवानगी असावी. ही तहकुबीची सूचना पास झाली तर सभेपुढील मुख्य प्रश्नविषय डावलला जातो. सभा बिनमुदत तहकूब होते. पुन्हा नोटीस, पुन्हा सभा वगैरे सर्व खटाटोप केल्यानंतर मगच तो विषय सभेपुढे येतो. पुष्कळ