पान:सभाशास्त्र.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४५ सभानियमन व संचालन सभेचे मत अंदाजण्याचा अधिकार आहे. सभेने दिलेले मत स्वीकारून तो जो निर्णय देईल तो त्याचाच निर्णय असतो. कॉमन्स सभेत वरीलप्रमाणे प्रथा आहे. कित्येक वेळां उपस्थित मुद्द्यावर सभेत चर्चा होऊन चर्चेचा कल पाहून अध्यक्षाने आपले मत बनवून निर्णय देणे इष्ट ठरते. सभेचे प्रत्यक्ष मत घेतल्यास अधिक इष्ट ठरते. सूचना परत घेणेः–नियमानुसार ठराव असला पाहिजे, जे कांहीं सभेपुढे प्रश्न म्हणून मांडण्यांत येतील ते नियमानुसार असले पाहिजेत, ज्या सूचनेतील भाषा असभ्य अगर अन्यथा गैर आहे, अगर नियमानुसार सर्वथा। अगर अंशतः नाहीं, ती आहे तशी मांडण्यास अध्यक्ष परवानगी देणार नाहीं. नियमांत बसेल, सभ्य भाषेत असेल, तर अध्यक्षाने परवानगी द्यावी. नियमानुसार आणलेली सूचना मांडली गेली व तिला रीतसर अनुमोदन मिळाले म्हणजे ती सभेपुढील प्रश्न होते. कित्येक ठिकाणी सभेपुढील प्रश्न जो असेल तो अध्यक्ष वाचून दाखवितो व मग त्याची चर्चा सुरू होते. एकदा सभेपुढील प्रश्न झाला म्हणजे तो सभेच्या परवानगीशिवाय परत घेता येत नाही. तो प्रश्न सभेच्या मालकीचा होता. सभा तो स्वकारील, नाकारील, डावलील, वाटल्यास त्यांत दुरुस्ती करील अगर तो परत घेण्याची परवानगी देईल. सभेपुढील प्रश्नावर अध्यक्षाचा, मांडणाराचा अगर अनुमोदकाचाही मग हक्क नाहीं. सभेपुढील प्रश्न ठराव असो, उपसूचना असो, सभेची एकमुखी संमति असल्याशिवाय परत घेता येत नाही. एक जरी सभासद परत घेऊ देण्याचे नाकारील तर परवानगी मिळणार नाहीं, व प्रश्नावर मत घेऊनच त्याचा निकाल लावला पाहिजे. शिवाय ज्याने सूचना अगर उपसूचना मांडली त्यालाच ती परत घेण्याचा अधिकार आहे. अनुमोदकास अगर अन्य सभासदास नाहीं. मांडणाराने परत घेण्याची परवानगी मागितली की अध्यक्षाने ‘परत घेऊ देण्यास परवानगी आहे का?' असा सवाल सभेला करावा. एक जरी आवाज ‘नाहीं' म्हणून आला तरी ती नाकारली असा निर्णय देऊन मूळ सूचनेवर सभेचे मत घेऊन तिचा निकाल लावावा. पुष्कळ वेळां वादविवादांत एक सूचना अगर उपसूचना परत घेऊन त्याऐवजी तडजोडीने दुसरी मांडण्यांत येते, पण त्याही वेळी सभेची सर्वसाधारण संमति आवश्यक आहे. तशी संमति नसेल तर पहिली सूचना अगर उपसूचना स...१०