पान:सभाशास्त्र.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र १४४ पोषाख केला अगर नाममात्र केला म्हणून इतर सर्वांनी त्याचे अनुकरण करावें हें अयुक्त आहे. वैयक्तिक अभिरुचि ठेवूनही कांहीं मर्यादा यांत असावी हे इष्ट आहे. कोर्ट-कचेन्यांतून जितकी मर्यादा पाळली जाते तितकी तरी पाळली जावी. देशकालपरिस्थितीप्रमाणे सभासदांनी सभ्य समजल्या जाणाच्या पोषाखांत यावे इतका तरी संकेत असावा. सभा म्हणजे कुंभमेळा नव्हे, यति, जति, गुंगे, गोसावी यांचा मेळावा नव्हे. सभा म्हणजे सभ्य जनांचा समुदाय आहे हे विसरणे योग्य नव्हे. भाषणाच्या मर्यादा राखल्या जातील, चर्चा नियमानुसार होईल, सभेमध्ये व्यवस्था व शांतता राहील, या सर्व गोष्टी दक्षतेने पाहण्याचे कार्य अध्यक्षाचे आहे. या गोष्टी व्हाव्यात म्हणून जरूर ते सर्व अधिकार नियमानें अगर प्रथेनें अध्यक्षास असतात. गैरकायदा अगर गैरराशिस्त गोष्ट दिसतांच अगर कोणीं दृष्टोत्पत्तीस आणल्यास त्याने ताबडतोब निकाल देऊन त्याप्रमाणे घडवून आणले पाहिजे. अध्यक्ष हा सभापति आहे, त्याने सभेचे न्याययुक्त संरक्षण केले पाहिजे. सभा सर्वसत्ताधीश पण नियमानुसार चालणारी असल्यामुळे, तिने आपले अधिकार योग्य अंमलबजावणी व्हावी म्हणून अध्यक्षाला अनेक बाबतींत दिलेले असतात. दिलेल्या अधिकारक्षेत्रांत व परंपरेने आलेल्या अधिकारक्षेत्रांत त्याचा निर्णय त्या सभेपुरता अखेरचा आहे. सभासंचालनाचे काम त्याने दिलेले निर्णय सभासदांनी पाळले पाहिजेत, त्यांच्या आज्ञा ऐकल्या पाहिजेत. न ऐकणारास सभेतून बाहेर घालविण्याचा अधिकार त्यास आहे. प्रसंगी त्याचे सभासदत्वही कांहीं काळ रद्द करण्याचा अधिकार आहे. सभेचे नियम अमलांत येतील हे पाहण्याचे काम त्याचे आहे, व त्याला इतका अधिकार असणे इष्ट आहे. जेथे नियम अगर संकेत स्पष्ट आहेत तेथे त्याने त्याप्रमाणे निर्णय दिले पाहिजेत. जेथे नियम लागू पडत नाहीं, प्रस्तुत असा संकेत नाहीं, अगर जेथे काय निर्णय द्यावा अशी शंका त्यास उत्पन्न होते, तेथे त्याला सभेचे मत घेऊन निर्णय देण्याचा अधिकार आहे. त्याने उपस्थित परिस्थिति सभेपुढे ठेवावी, चर्चा होऊ द्यावी, पण स्वतः चर्चेत भाग घेऊ नये. सभेने दिलेले मत स्वीकारून त्याप्रमाणे निर्णय द्यावा, नियमाप्रमाणे सर्वे संस्थांतून विधिमंडळे धरून, उपस्थित झालेल्या कायद्याचे मुद्दयावर अगर आक्षेपावर अगर कामकाजी प्रश्नावर (Points of order ) सभेपुरतां निर्णय अध्यक्षानेच दिला पाहिजे असे असते. तथापि विशिष्ट परिस्थितींत अध्यक्षाला