पान:सभाशास्त्र.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४३ सभानियमन व संचालन

- --- एका सभासदाने गंभीरपणे सांगितलें कीं, ‘सरकारने ताबडतोब भाषणाचे गतीवर नियंत्रण घालणारे बिल आणावें; लोकहितार्थ ते अत्यंत अवश्य झालें आहे. इष्ट तो परिणाम होऊन वक्ता बेताने बोलू लागला. * दिवसरात आम्ही स्वराज्याचे चिंतन करीत आहोत हे शब्द काँग्रेस पक्षप्रमुखाचे तोंडातून बाहेर पडतांच “ मग सूत केव्हां काततां : असा बोचक प्रश्न एकाने विचारतांच एकदम वातावरणांत फेर पडला. देशाचे संरक्षण सरकार कसे करीत आहे हे सांगतांना * सैन्य, आरमार, विमाने ही सर्व सज्ज असून त्याचा उपयोग संरक्षणाला पुरेसा आहे असे वाक्य उच्चारतांच * भारतसंरक्षक कायद्यालाही न्याय द्या, कारण संरक्षणाचा भार त्यावरच विशेष पडलेला दिसतो. हे वाक्य उच्चारणाच्या सभासदाने चांगलाच मर्मभेद करून सत्य उघड केलें. * नामदार हे जनावरांचे प्रसिद्ध डॉक्टर आहेत हें वाक्य हेटाळणीसाठी उच्चारतांच-कारण सदरहु डॉक्टर हे प्रसिद्ध सर्जन होतेदुस-या सभासदानें “ होय ! तुमच्यावर शस्त्रक्रिया करतांना ते तसलेच डॉक्टर होते' असा टोला मारतांच पहिला सभासद् बसला व सभेतील अशिष्ट भाषण टळले. विनोदी कोटिक्रम, मार्मिक आक्षेप, अगर आघात, व्यंजनापूर्ण उल्लेख हे जोपर्यंत सभ्य भाषेत आहेत तोपर्यंत एखाद्या दुस-या वाक्याने श्रोतृवृंदांतून केले गेले तर, ते अडथळा मानणे इष्ट नाहीं. सभा ही वादभूमि आहे, रणक्षेत्र आहे. योग्य आयुधांचा उपयोग करण्याचा हक्क श्रोते व वक्ते या दोघांनाही आहे. अधर्मयुद्ध होत नाही एवढेच अध्यक्षाने पाहावें. सभेत पांडित्य, मार्मिकता दाखवावयाची नाही तर कोठे दाखवावयाची १ । शब्दांवरून हाताहातीवर प्रसंग येऊ नये. मुद्दे जाऊन गुद्दे येऊ नयेत म्हणून अध्यक्षाने खबरदारी घेतली पाहिजे. या दृष्टीने विधिमंडळांत काठ्या व छत्र्या नेण्यास बंदी आहे. तथापि अनेक प्रसंगी कॉमन्स सभेत पुस्तकांचा उपयोग टाळकी सडकण्याकडे झालेला आहे. विधिासद्ध संस्थांच्या सभेत काठ्या व छत्र्यांना बंदी असावी. अन्य ठिकाणीसुद्धा हा प्रघात पाळणे इष्टच ठरेल. सभेमध्ये सभासदांनी कोणत्या पोषाखांत यावे, याही बाबतीत कांहीं मर्यादा असणे इष्ट आहे. स्थानिक स्वराज्य-संस्था, विधिमंडळे यांतून तविषयक नियमही आहेत. आपण सभेला जात आहों या दृष्टीने सभासदांनी पोषाख केला पाहिजे. अपवादभूत म्हणून एखाद्या महात्म्याने विशिष्ट त-हेनें