पान:सभाशास्त्र.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र १४२

बाजूलाच रहातात व पुष्कळ वेळा भांडणाचे वातावरण उत्पन्न होतें, बोलणारा वक्ता हा साक्षीदार नव्हे की, त्याची सारखी उलटतपासणी व्हावी. त्याची विधाने व विचारसरणी पसंत नसेल तर नापसंती दाखविण्यासाठी सारख्या टाळ्या वाजविणे, टेबलावर सारखे हात आपटणे, सारखे ओरडणें हें शिष्टसंमत नाहीं. तीव्र नापसंती दाखविण्यासाठी सभा सोडून तात्पुरते बाहेर जाणे हा परिणामकारक उपाय आहे. ‘खाली बसा’, ‘बोलू द्या’, ‘वाहवा वाहवा' वगैरे उद्गार योग्य वेळीं व योग्य प्रमाणांत उच्चारल्यास हरकत नसावी. वक्त्याची टवाळी करण्यासाठी हंसणे, टाळ्या पिटणे हा त्याचा अपमान नसून सभेचा आहे हे लक्षात ठेवणे जरूर आहे. वक्त्यास प्रश्न विचारावयाचे असतील तर उभे राहून विचारले पाहिजेत, व वक्त्याने खाली बसून प्रश्न विचारण्याची संधि दिली तरच विचारता येईल. प्रश्न सुद्धा एकसारखे विचारणे अयुक्त आहे. प्रश्नसुद्धां प्रश्न असावा. त्याचे स्वरूप वादविवादात्मक नसावे, तसे असेल तर तो प्रश्न न राहतां भाषणच होते. हक्क असेल तर प्रश्नाऐवजी भाषण करणेच इष्ट ठरते. श्रोत्याकडून प्रश्नरूपानें अगर घोषणेनें अगर टीकात्मक वाक्याने होणारा अडथळा पुष्कळ वेळां चर्चेला इष्ट वळण देतो, प्रसन्न वातावरणही चर्चेत उत्पन्न करतो. विनोदी, मार्मिक, विषय स्पष्ट करणाच्या, मुद्देसूद शब्दोच्चाराने अडथळा होत नाही, पण हे शब्द थोडे व चटकदार असतील तरच त्यांत लज्जत असते, अन्यथा वर्दळीवर काम येते व तसे होणे अनिष्ट आहे. वक्त्याला भाषण करणे अशक्य करणारे अडथळे अध्यक्षाने मना केले पाहिजेन, ‘शेम शेम' सारखे ओरडणें हें बंद करणे इष्ट आहे. कारण असल्या ओरडण्याने भाषणांत अडथळा होतो, व सभेतील शांतता भंग होण्याचा प्रसंग येतो. पक्षभावना अडथळ्याने तीव्र होऊन वातावरण मलीन होणार नाही याची खबरदारी अध्यक्षाने घेतली पाहिजे, पण मार्मिकता व हजरजबाबीपणा यांना योग्य वाव दिल्याने चर्चेमुळे मनावर वाढणारा ताणही कमी होतो. साखरेवरील जकातीसंबंधी प्रश्नोत्तरे होत होतीं, व वातावरण गरम झाले होते, त्या वेळी एका सभासदाने पुढील वाक्य उच्चारून वातावरण निवळवलें. * नामदार सभासदांना साखर तोंडांत असूनसुद्धा गोड बोलता येत नाही. खरोखरच देशी साखरेची गोडी कमी झाली आहे की काय ?” मोटारीचे गतीवर नियंत्रण घालावें यावर बोलणारा मद्रासी वक्ता इतक्या जलदीने बोलत होता की, श्रोत्यांना समजणे अशक्य होते. या वेळी