पान:सभाशास्त्र.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४१ सभा नियमन व संचालन

गृहांतच होत असेल तर तीही नाही. मतमोजणीसाठी सभासदांना मतदानाचे खोलींत (voting lobby ): जावे लागत असेल तरच ही सवलत आहे. कारण या वेळी सभेपुढे अन्य कार्य नसते. सभासद् मत देण्यासाठी जात असतात. थोडेसे अनौपचारिक वातावरण उत्पन्न होते. हा अपवाद सोडून सभासद केवढाही महत्त्वाचा असो त्यानेसुद्धा वरील नियम पाळले पाहिजेत. सभेतील अध्यक्षालासुद्धां वरील नियम लागू आहेत. सभेची प्रतिष्ठा राखप्याची खरी जबाबदारी अध्यक्षाचीच आहे. त्याचे वर्तन आदर्श पाहिजे, । सभासदांनी त्यांना दिलेल्या जागी बसावें. जागा निश्चित केलेली नसेल तर आपआपल्या गटांतून बसावें. एकदा एके ठिकाणी बसल्यानंतर ती सभा संपेपर्यंत जागा बदलू नये. जागा वारंवार बदलण्याने सभेचे कार्यात न्यूनता येते. अध्यक्षाला वक्त्यांचा क्रम ठरवितांना अडचण पडते. निाश्चत् । जागा असली म्हणजे कोणता गट कोठे आहे, कोणता सभासद कोठे आहे हैं त्याला कळते. सामान्यतः विधिसिद्ध संस्थांनी सभागृहांत सभासदांना जागा मुक्रर करून देणे इष्ट आहे. विधिमंडळांतून हा प्रघात आहे. पक्षागणिक भाग देण्यांत येतो व त्या भागांत त्या पक्षांतील लोक कसे बसावेत हे तो पक्ष ठरवितो व ती व्यवस्था अध्यक्षास कळविण्यांत येते. असल्या व्यवस्थेने चर्चेत सुलभता येते, सभासदांना आपले कोण, विरुद्ध कोण याचे ज्ञान सहज होते. म्हणून सभासदांच्या जागा मुक्रर केलेल्या असाव्यात. जेथे हे शक्य नसेल तेथे सभासदाने एकदा जागा घेतली की ती सभा संपेपर्यंत सोडू नये. मतमोजणीचे वेळी जेव्हां मतदानाचे खोलीत जावयाचे असेल तेव्हा घोळक्याने उभे राहून हलक्या आवाजात बोलण्यास बहुतेक विधिमंडळांतून परवानगी आहे. अन्यथा या जागा सोडुन सभागृहांत भटकणे, घोळका करून चर्चा करणे मना आहे व सभाकायचे सफलतेसाठी ही मनाई इष्ट आहे. त्याचप्रमाणे जागेवर सभ्य रीतीने बसले पाहिजे. आडवे पडणे, निजणे, अस्ताव्यस्त बसणे या गोष्टी सभा चालू असतां करणे म्हणजे सभेची अप्रतिष्ठा करणें आहे. सभेमध्ये सभासदांनी होणारे भाषण शांततेने ऐकले पाहिजे. वक्त्याला वारंवार अडथळा करणे, उगाच एकामागून एक प्रश्न विचारून सताविणे, कांहीतरी मधेच ओरडून त्याच्या वक्तृत्वांत व विचार-प्रणालींत गोंधळ उत्पन्न करणे हे वर्ण्य आहे. सारखी प्रश्नोत्तरे होऊ लागली म्हणजे मुख्य मुद्दे