पान:सभाशास्त्र.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ससाशास्त्र १४० भागांतून त्या भागांत जाऊ नये. वक्ता व अध्यक्ष यांच्यामधून शक्य तर जाऊच नये व जाणे झाल्यास वांकून जावे म्हणजे वक्त्यास अडथळा होत नाहीं. सभा चालू असतां सारखे सभागृहाचे बाहेर जाणे व पुन्हा येणे या ये-जा-नें सभाकायत व्यत्यय येतो. जरूर तेव्हांच जावे व तेही आदबीने व आवाज न करतां, येतांनाही तसेच यावे. विधिमंडळांत बाहेर जाणारा सभासद प्रथम आपले जागेवर उभा राहतो, अध्यक्षास वांकून अभिवादन करतो व नंतर जातो. आला म्हणजे आपले जागी उभा राहतो, अध्यक्षास वांकून अभिवादन करतो व मग बसतो. सभा चालू असतां सभागृहांत शांतता तर त्यांनी राखावीच, पण उगाच वर्तमानपतें फडफडू नयेत. त्यांनी वास्तविक चर्चा ऐकली पाहिजे म्हणून कांहीही वाचता कामा नये. तथापि कांहीं वाचणे झाल्यास वर धरून अगर मोठ्याने वाचू नये. ज्याला भाषण करावयाचे असेल त्याने तयारीचे दृष्टीने जरूर वाचावें, पण मनांतले मनांत व इतरांचे लक्ष वेधेलं अशा रीतीने नव्हे. अन्य सभासदाचे लक्ष वेधलें म्हणजे सभेचे कायत अशांतता उत्पन्न होते. | ससेच सभागृहांत सभा चालू असतां घोळक्याने उभे राहूं नये. सभा चालू असतां सर्व सभासदांनी बसले पाहिजे व एकट्या वक्त्याने उभे राहून बोलले पाहिजे, सभा चालू असतां तंबाखू ओढणे, चहा पिणे अगर अन्य पेय पिणे अगर. खाणे हे शिष्टसंमत नाहीं. नरेंद्र मंडळांत खाणे, पिणे व तंबाखू ओढणे या सर्वांना सभा चालू असतां मोकळीक आहे. यामुळे सभासदापुढे कामकाजाचे कागदाऐवजी: केक-केळ्यांचा संभार असतो व एकंदर वातावरण सभेऐवजी क्षुधाशांतिभवनाचे वाटते. चर्चेला अवश्य अस वातावरण असल्या परिस्थितींत उत्पन्न होत नाही. अन्य कोणत्याही विधिमंडळांत अशी परवानगी नाहीं. वक्त्याला त्रास होत असेल तर त्याने मधून मधून पाणी पिण्यास हरकत नाही. ही सवलत सर्वांना दिल्यास पाणी अगर अन्य पेय आणून देणारे यांची ये-जा सभेत सुरू होते व सभेचे लक्ष भंगते, सभागृहाचे शेजारी पण सभागृहाचे बाहेर पेयाची अगर तंबाखू पिण्याची जागा असावी. सभा चालू असतां विड्या ओढण्याची सवलत ठेवली तर सभेत प्रकाशाऐवजी धुरच सर्वत्र दिसून येईल !! कांहीं विधिमंडळांतून मतमोजणीचे वेळीं- (during: division ) सभासदाना विडी ओढण्याची परवानगी असते. मात्र मतमोजणी जर प्रत्यक्ष सभाः ।