पान:सभाशास्त्र.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३९ सभानियमन व संचालन होते व निर्णय न झालेल्या मागण्या अध्यक्ष एकामागून एक मताला घालतो. मागणी मांडली जाते व लागलीच अध्यक्ष मताला घालतो. चर्चाबंदीची सूचना लागत नाही. तसेच त्या वेळी सभातहकुबीची सूचना अगर अन्य कोठलीही सूचना अगर उपसूचना अध्यक्ष घेत नाहीं. दिलेल्या वेळांत ( alloted time ) चर्चा झाली पाहिजे; न संपल्यास वरील पद्धतीने ती संपविण्यांत येते, व सभेचे निर्णय घेण्यात येतात. या पद्धतीस: कत्तल (Gullotine ) असे विनोदाने म्हणतात. अंदाजपत्रकावरील चर्चेला कालमर्यादा आहे तशी फडणिशी व्यवस्था बिलावरील ( Finance Bill) चर्चेस नाही. कारण ते बिल आहे व तें पास होऊन कायदा व्हावयाचा असतो. निश्चित स्वरूपाचा, निकडीचा व सार्वजनिक महत्त्वाचा प्रश्न असेल तर त्याचे चर्चेकरतां, सभातहकुबीचा ठराव आणतां येतो व त्यावरील चर्चा दोन तासांत संपली पाहिजे असा नियम आहे. या कालांत चर्चा न संपली तर तो विषय तसाच अनिर्णीत राहतो व पुन्हा सभेपुढे आणता येत नाहीं. | (१०) सभेतील वर्तनः—सभा म्हणजे कांहीं निश्चित विषयांचा नियमाप्रमाणे विचार करण्यासाठी एकत्र आलेले सभासद. जसे बोलणाच्या सभासदाने कसे बोलावे, काय बोलावें, केव्हां बोलावें, कशावर चर्चा करावी यासंबंधी मर्यादा सांगितल्या, तशाच मर्यादा सभेचे कार्य सफल व्हावे म्हणून ऐकणाच्या सभासदांवरही आहेत. अध्यक्ष, वक्ते व श्रोते हे सर्व नियमाने बद्ध आहेत. सभासद असेल त्यालाच सभेत उपस्थित होण्याचा व भाग घेण्याचा अधिकार आहे. सार्वजनिक सभेत जाहीर निमंत्रणाप्रमाणें हजर राहणारे श्रोते हे त्या सभेचे सभासद असतात. संघटित व नियमाने चालणाच्या संस्थांचे सभासदत्व में कांहीं केवळ त्यांच्या सभेला हजर राहण्याने मिळत नाहीं. घटनेप्रमाणे सभासद अर्ज करून झाले पाहिजे, अगर भाग घेऊन अगर निवडून आले पाहिजे. सभासद झाला म्हणजे व जपर्यंत नियमान्वयें सभासदत्व कायम आहे तोपर्यंत सभेला हजर राहण्याचा व तींत भाग घेण्याचा अधिकार त्या इसमास आहे. सभेस हजर राहण्याचा व भाग घेण्याचा हक्कही नियमांप्रमाणे त्याने वापरला पाहिजे. ज्या वेळी सभासद हा वक्ता नसेल त्या वेळी त्याने आपले जागेवर बसले पाहिजे. शांततेने राहिले पाहिजे. सभासद जर आपसांत कुजबूज करू लागले तर वक्त्याचे भाषण ऐकू जाणार नाहीं व चर्चेला कमीपणा येईल. श्रोते-सभासदांनीं समा चालू असतां उगाच सभेच्या या