पान:सभाशास्त्र.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ससाशास्त्र १३८ योग्य प्रसंगी ते बंद करण्यास सांगावे. कालमर्यादा आहे, म्हणून चर्चा अपुरी होऊ नये व कालमर्यादा नाही म्हणून तिचे अजीर्ण होऊ नये ही दोन्ही अध्यक्षाने योग्य नियंत्रणाने साधली पाहिजेत. व्यक्तिशः वक्त्यावरील भाषणाप्रमाणे एकंदर चर्चाकालाचीही मर्यादा ठरविणे इष्ट आहे. विधिंसिद्ध संस्थांच्या (Statutary Bodies) सभा वारंवार भरत असतात. शिवाय एकदा काढलेली सभा एकाच दिवसांत संपते असे नाही. त्यांच्या सभेतील विषयावरील चर्चेलासुद्धा कालमर्यादा घालणे इष्ट असते. ज्या इच्छाासद्ध संस्था वषांतून एक दोन वेळा आपल्या सभासदांच्या सभा भरवितात त्यांच्या सभेत चर्चा-कालाला मर्यादा घालणे अत्यंत इष्ट असते. सहकारी संस्था, व्यापारी कंपन्या यांच्या सभा, राजकीय पक्षांच्या सभा, वाचनालयासारख्या संस्थेच्या सभा कांहीं दैनंदिन अगर वारंवार बोलावितां येत नाहींत. महामंडळाची ( General Body ) सभा वर्षातून एकदा फार तर दोनदा भरते, व तीही ३-४ तासांपेक्षा अधिक वेळ काम करीत नाही हे लक्षात घेतां, सभेत येणाच्या विषयावरील चर्चा अमर्याद काल चालणे अशक्य आहे, म्हणून असल्या सभांतून अध्यक्षाने, प्रत्येक विषय चर्चेस घालण्यापूर्वी एकंदर त्यावरील चर्चेचा काल सभेचे संमतीने ठरवावा, अगर प्रत्येक विषयास किती काळ द्यावा हे ठरवून घ्यावे व तो काल संपताच चर्चा बंद करून प्रश्न ज्या स्थितीत असेल त्या स्थितीत मतास घालावा. दिलेला वेळ ( alloted time ) संपताच चर्चा-बंदीची सूचना करण्याचे मग कारण नाहीं. चर्चाबंदी केव्हा करावी हे वेळ ठरविल्याने आपोआप ठरले जाते. ठरलेल्या वेळांत मुख्य प्रश्न, त्यावरील उपसूचना या सर्वांचा विचार झाला पाहिजे, वक्त्याचा क्रम अध्यक्षाने न्यायबुद्धीने ठरविला पाहिजे. पुष्कळ वेळा नियमांतच विशिष्ट चर्चेला कालमर्यादा घातलेली असते. कित्येक संस्थांतून कार्यकारी मंडळांचे ठराव पास झाल्यानंतर व्यक्तिशः सभासदांचे ठराव घेण्यांत येतात व त्यांना ठराविक वेळ दिलेला असतो. त्या वेळांत जेवढी व जेवढ्या विषयांची चर्चा होईल तेवढीच होईल व ती वेळ संपताच चर्चाहीं संपेल व अनिणितपणेही संपेल. विधिमंडळांतून कांहीं कांहीं विषयांच्या चर्चेबाबत कालमर्यादा नियमांतच असतात. अंदाजपत्रकावरील चर्चा ठराविक दिवसच चालते. मागण्यांवरील चर्चा ठराविक दिवसांतच पुरी व्हावी लागते. शेवटचा क्षण येतांच चर्चा बंद