पान:सभाशास्त्र.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संक्षाशास्त्र १३६ .

तितका वेळ भाषणे करणे हे सर्व नियमांत राहुन करता येते व केले जाते. उलट ठरावाला अनुमोदन मिळतांच ‘मतास टाका' म्हणून सूचना आणणे, चर्चा होऊ न देणे, कोरम मोडणे, महत्त्वाचे व ताबडतोबी प्रश्न म्हणून साधारण नियम बाजूस ठेवून झटपट काम करून घेणे हेही सर्व नियमांत राहून करता येते. नियमांचा दुरुपयोग होणार नाही, सभासद् त्यांच्या साहाय्याने सभाकार्यात अडथळा उत्पन्न करणार नाहीत हे पहाण्याचे कार्य अध्यक्षाचे आहे, व जेथे अध्यक्षाची खात्री वक्त्याचे अनिष्ट हेतूबद्दल झाली असेल तेथे त्याने चर्चेला मर्यादा घातलीच पाहिजे. मागें सांगितल्याप्रमाणे बुद्धिपुरस्सर अडथळा करणा-या वक्त्याला भाषण बंद करण्यास सांगितले पाहिजे, सूचना ताबडतोब मतास घातली पाहिजे. अगर प्रसंगी सूचना अगर उपसूचना मांडण्यासच परवानगी नाकारली पाहिजे. निर्णय न ऐकणारे सभासदासं त्या सभेतून बाहेर जाण्यास सांगण्याचा, न गेल्यास घालविण्याचा हक्क प्रत्येक अध्यक्षास आहे. (८) गैरवर्तनः–सभेत शांतता राहावी या दृष्टीने जरूर त्या मर्यादा घालण्याचा अधिकार अध्यक्षाला आहे. असभ्य वर्तणूक करणाच्या सभासदास, गुंडगिरी व दंगामस्ती करणाच्या सभासदास बाहेर घालविण्याचा अधिकार प्रत्येक अध्यक्षास असणे इष्ट आहे व हा अधिकार सर्वमान्य आहे. काही प्रसंगीं अपराधी सभासदाचे सभासदत्व कांहीं काळ रद्द करण्याचा अधिकारही अध्यक्षाला असणे इष्ट आहे. एका दिवसापुरते सभासदत्व रद्द करण्याचा अधिकार अध्यक्षाला असावा, पण आधक काळ तो रद्द करावयाचा असल्यास सभेची संमति असावी, व सभेला योग्य निर्णय देतां यावा म्हणून अपराधी सभासदाला जरूर तो खुलासा करण्याची संधि मिळावी. साधारणपणे चौकशी अगर अपराधी सभासदाला आपली बाजू मांडण्यास अवधि दिल्याशिवाय सभेने त्याचे बाबतींत निर्णय घेणे इष्ट नाही. . (९) कालमर्यादाः–व्यक्तिशः सभासदाचे भाषणास व साकल्याने प्रत्येक विषयाचे चर्चेस कांहीं तरी कालमर्यादा असणे इष्ट आहे. साधारणपणे ठराव मांडणाराने २० मिनिटांपेक्षा जास्त बोलू नये. अन्य वक्ते यांनी १५ मिनिटांपेक्षा जास्त बोलू नये. जेथे उत्तर देण्याचा अधिकार असेल तेथे उत्तरादाखल केलेले भाषण १५ मिनिटांत आटपावें. विषयावरील तज्ज्ञ म्हणून नाणावलेले सभासद व पक्षप्रमुख यांना थोडा अधिक वेळ दिल्याने चर्चेस