पान:सभाशास्त्र.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र १३४

کی می سی عمومی مع حرم می त्याला खेद वाटतो. अध्यक्ष हा सभेत नियमांचा अर्थ करणारा, व्यवस्था राखणारा एकमेव अधिकारी आहे हे अध्यक्षाचे म्हणणे ग, ज.ला मान्य आहे.” अध्यक्ष जर गैरशस्त वागेल तर नियमाप्रमाणे सभा आपली हुकमत चालवील. अन्यथा तो सभेच्या कामाचे पद्धतीवावत, नियमाबाबत, एकमेव अधिकारी आहे व त्याचे निर्णयावर चर्चा नाहीं. अध्यक्षाचे निर्णयावर ताबडतोब चर्चा होऊ लागली व सभेतील बहुमतानें तो रद्द होऊ लागला तर अनर्थ व अनवस्था होईल. सभेतील बहुमताचे जोरावर ठरावच पास करता येतील येवढेच नव्हे तर, कोणी बोलावे, किती बोलावे, काय बोलावे याबाबतचे सर्व निर्णय बहुमतानेच होतील. अल्पमतवाल्यावर अन्याय होईल व युक्त व यथासांग चर्चा अशक्य होऊन नानाविध मतांचा आविष्कार होऊन जे समामत बनवावयाचें तें न होता, एकतर्फी चर्चा होऊन निर्णय होईल. सभेचा विचारविनिमय होऊन झालेला असा तो निर्णय होणार नाही. थोडक्यांत सभेचा व चर्चेचा मुख्य उद्देश विफल होईल, म्हणून अध्यक्षाला सर्वांना न्याय मिळावा, सभेचे कामांत व्यवस्था, सभ्यता, समाधान राहावे म्हणून, सभानियम व संचालनासंबंधी अखेरचे अधिकार असणे इष्ट आहे, अवश्य आहे. एतविषयक त्याचे निर्णय अखेरचे म्हणून सभेने त्या परिस्थतीत मानले पाहिजेत, (६) कागदोपत्री उल्लेखः–भाषणाला ज्या मर्यादा वर सांगितल्या त्या अर्थात् चर्चेलाही आल्याच. भाषणांत जे. उतारे अगर कागदोपत्नी उल्लेख येतील ते ग्रंथ अगर कागदपले सर्वांना उपलब्ध होण्यासारखी असली पाहिजेत. जे प्रसिद्ध झालेले ग्रंथ आहेत त्याबद्दल प्रश्नच नाहीं. पण अप्रसिद्ध अगर गैरकायदा प्रसिद्ध झालेले ग्रंथ, अगर रिपोर्टस यांतून वाचून दाखविणे चर्चेचे दृष्टीने अयोग्य आहे. जी साधनसामुग्री एका सभासदास मिळविता येते ती प्रत्येकाला मिळण्याची संधि असली पाहिजे. तसेच खाजगी पलें अगर दस्तऐवज यांतून वाचून दाखवावयाचे असेल तर ते कागदपल सभेपुढे वाचणाराने ठेवले पाहिजेत. कागद गुप्त अगर खाजगी, सभेपुढे न ठेवता त्यावर विधार्ने आधारावयाची हें सभेवर अन्याय करणारे आहे. सभेपुढे कागद धरावयाचा व अभिनिवेशाने विधानें व वक्तृत्व करावयाचे असेल तर तो कागद संपूर्ण वाचून तरी दाखविला पाहिजे अगर सभेपुढे ठेवला पाहिजे. सभासदांना त्यातील पूर्ण मजकूर कळला पाहिजे. तो खरा को बनावट आहे याची परीक्षा