पान:सभाशास्त्र.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र १३२ मांडता येणार नाही. पण दुस-याने मांडली तर तीवर बोलतां येईल, अशी व्यवस्था कॉमन्स सभेच्या नियमांतही आहे. तथापि तहकुबीची सूचना अनेक संस्थांतून त्याच त्या सभासदांस पुनः पुन्हा मांडण्याचा नियमाने हक्क आहे. त्याचबरोबर सभातहकुबीच्या सूचनेवर भाषणच करावयाचें नाहीं नुसती मांडावयाची असाही नियम अनेक स्थानिक स्वराज्यसंस्थांतून आहे. एकदां तहकुबीची सूचना मांडली म्हणजे पुन्हा त्याच सभासदाला ती मांडण्याचा हक्क नाहीं, यामागील तत्त्व एकाच सभासदाला एकाच प्रश्नावर दोनदा बोलण्याचा हक्क नाही हे आहे. त्याला हक्क नसला पण सभेपुढे इतरांनी तहकुबीची सूचना मांडली तर त्याच विषयावर त्याला पुन्हा बोलण्याची संधि मिळते हेही खरे आहे. त्याला भाषण करण्यास मिळते म्हणून प्रत्येक तहकुबीच्या सूचनेवर भाषण बंदी असावी, हैं इष्ट नाहीं. निदान चर्चेला सुरुवात होण्यापूर्वीच जी प्रथम चर्चा अगर सभातहकुबाची सूचना येईल तिजवर भाषण करण्याचा, चर्चा करण्याचा अधिकार असावा. तहकुबीची कारणे कळणे इष्ट असते. चर्चा सुरू झाल्यानंतर येणाच्या तहकुबीच्या सूचनेवर चर्चेचे दृष्टीने अधिक नियंत्रण असणे इष्ट आहे. दर अध्या तासाने येणाच्या तहकुबीचे सूचनेवर चर्चा व भाषणे मना करणे अगदीच अयोग्य नाही. ज्या सूचना केवळ कालहरण करण्याच्या आहेत ( Dilatory Motions ), ज्यांचा उद्देश केवळ चर्चेचा निकाल लागू नये, ती लांबावी अगर तींत अडथळा उत्पन्न होऊन स्थगित व्हावी असा आहे, अशा सूचनांचे नियंत्रण होणे अत्यंत इष्ट आहे. म्हणून चर्चा तहकूब करावी अगर चर्चा सुरू झाल्यानंतर सभा तहकूब करावी, या सूचनेवरील भाषण सूचनच्या विषयापुरतेच मर्यादित असावें. लोकमताचा अंदाज घेण्यासाठी बिल अमुक मुदतीपर्यंत फिरते करावें ( Circulate ), ही सूचनाही सामान्यतः त्याच स्वरूपाची असते. तिच्यावरील भाषण तींतील विषयापुरतेच मर्यादित असावें. इतकेच नव्हे तर अध्यक्षाला असली सूचना केवळ नियमांचा दुरुपयोग व गैरफायदा घेण्याचे दृष्टीने आणली आहे असे वाटेल तर, त्याने सूचना मांडल्याबरोबर भाषणे होऊ न देतां मतास घालावी अगर ही सूचना गैरशिस्त आहे म्हणून मांडू देण्याची परवानगी प्रसंगी नाकारावी, कायद्याचा मुद्दा अगर आक्षेप उपास्थित झाला तर त्यावर बोलण्याचा