पान:सभाशास्त्र.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३१ सभानियमन व संचालन

يعمل على جميع شویم

  • -*-*-*-*-*-*

-

  • -*.

चर्चेत भाषण करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. त्यांनी एकदां भाषण केलेले असते. सभा तहकूब झाली व पुढे भरून त्याच प्रश्नावर चर्चा सुरू झाली म्हणजेही पुन्हा बोलण्याचा हक्क प्राप्त होत नाहीं. - एकाच प्रश्नावर पुन्हा बोलण्याचा हक्क नाही याचा अर्थ, त्याच चर्चेत नवीन प्रश्न सभेपुढे आला तरीही बोलण्याचा हक्क नव्हे असा नाहीं. मुख्य प्रश्नावर चर्चा चालू असतां सभा तहकूब करावी ही सूचना आली असतां सभेपुढे नवीन प्रश्न आला असे होते. यावर बोलण्याचा हक्क सर्वांना आहे. मुख्य प्रश्नावर चर्चेत जे सभासद बोलले असतील त्यांनाही तो आहे. या प्रश्नाची चर्चा तहकूब व्हावी, हीही सूचना नवा प्रश्न आहे. पूर्वप्रश्नाची सूचना आली तर तीही नवा प्रश्न आहे. तसेच उपसूचनाः ही स्वतंत्र प्रश्न म्हणून पुढे आली की, तोही नवा प्रश्न होतो. प्रत्येक नव्या प्रश्नावर बोलण्याचा सभासदांना हक्क आहे. प्रत्येक पृथक् प्रश्नावर एकदां बोलण्याचा हक्क आहे. ज्याने एका प्रश्नावर एकदां भाषण केलें कीं, त्याच प्रश्नावर त्याला पुन्हा भाषण करण्याचा अधिकार नाही. ज्याने प्रश्नावर एकदां भाषण केलें असेल, उपसूचना आणली असेल अगर तिला अनुमोदन दिले असेल, अगर चर्चा-तहकुबीची सूचना आणली असेल अगर तिला अनुमोदन दिले असेल त्याला पुन्हां उपसूचना आणता येणार नाहीं. अगर सभा, अगर चर्चातहकुबीची किंवा तत्सम सूचनाही आणतां येणार नाही. तथापि इतराने कोणी अशा रीतीने नवा प्रश्न सभेपुढे आणल्यास त्यावर बोलण्याचा त्याला हक्क आहे. म्हणजे ज्याने प्रश्नावर उपसुचना न आणतां भाषण केले त्याला पुन्हा उपसूचना आणता येणार नाही; पण, आली असतां उपसूचनेवर बोलतां येईल. कारण तो नवीन प्रश्न होतो. मात्र उपसूचनेत जेवढा नवीन विषय असेल तेवढ्यापुरतेच त्याचे भाषण मर्यादित असले पाहिजे. तसेच ज्याने प्रश्नाला एक उपसूचना मांडली अगर तिला अनुमोदन दिले त्याला त्याच प्रश्नाला दुसरी उपसूचना मांडतां येणार नाहीं अगर तिला अनुमोदन देता येणार नाही. पण दुस-याने कोणी मांडली, व जर ती नवा विषय ठरली तर तिजवर बोलतां येते.. कोणत्या उपसूचनने चर्चेला नवा विषय होतो, सभेपुढे नवा प्रश्न येतो हे अध्यक्षाने ठरवावयाचे असते, उपसूचनेने नवीन प्रश्न उपस्थित होत नसेल तर, पुन्हा बोलण्याचा हक्क प्राप्त होत नाहीं. तसेच ज्याने चर्चा अयर समातहकुबीची सूचना एकदां मांडली त्याला पुन्हा