पान:सभाशास्त्र.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ससाशास्त्र १३० णारांचे बाबतीत त्याने प्रथम भाषण केलें अगर राखून ठेवले तरी उत्तराचा हक्क त्याला असल्याने प्रश्न उपस्थित होत नाहीं. अनुमोदकास दोनदा भाषण करण्याचा अधिकार नाहीं. तथापि केवळ त्यानें “ मी अनुमोदन देतों एवढे म्हणण्याने भाषण केले असे म्हणणे थोडे अन्यायी वाटते. वरीलप्रमाणे अनुमोदन केवळ औपचारिक असेल तर अनुमोदकास आपले भाषण राखून ठेवण्यास अधिकार असावा व पुढे त्यास भाषण करावयास संधि मिळावी हे इष्ट आहे व अशी प्रथा आतां मान्यता पावली आहे. जेथे ठरावाला अनुमोदनाची नियमाने आवश्यकता नाही तेथे अर्थात् हा प्रश्न उपस्थित होणार नाहीं. अनुमोदकच नाही तेव्हां त्याचे भाषण राखून ठेवण्याचा प्रसंगही नाही. कामकाजाच्या औपचारिक ठरावावर भाषण राखून ठेवण्याचा अगर उत्तर देण्याचा हक्क नाही. म्हणून कॉमन्स सभेत असला ठराव उभे राहून सभासद् न मांडतां पुष्कळ वेळा जागेवर बसून टोपी उचलतो व त्याचा अर्थ त्याचे नांवावर असलेला अगर त्यास मांडावयाचा ठराव त्याने मांडला व रीतसर मांडला असा होतो. या युक्तीमुळे त्याला पुढे चर्चेत भाषण करतां येते, कॉमन्स सभेत उभे राहून एक वाक्य जरी सभेपुढील प्रश्नावर उच्चारलें अगर तो प्रश्न नुसता मांडला तरी ते भाषण होते. नुसते ' अनुमोदन देतों ' असे उभे राहून म्हटले की ते भाषण होते व बसून ते म्हणता येत नाही. कारण उभे राहुन बोलले पाहिजे. म्हणून पुष्कळ वेळां अनुमोदक ही टोपीची युक्ति योजतात. उठत नाहींत, बोलत नाहीत, व पुढे भाषण करतात. ही नियमावर टोपी घालण्याचे प्रथेपेक्षां भाषण राखून ठेवण्याचा नियमानुसार हक्क असावा हे अधिक चांगले, 'उपसूचना मांडणारास उत्तर देण्याचा जसा हक्क नाहीं तसाच भाषण राखून ठेवण्याचाही हक्क नाहीं. एकदां उपसूचना मांडतांना बोलल्यानंतर पुन्हा बोलण्याचा हक्क नाहीं. उपसुचनेच्या अनुमोदकासही भाषण राखून ठेवण्याचा, उत्तरे देण्याचा अगर चर्चेत पुन्हा बोलण्याचा हक्क नाहीं. जे काय बोलावयाचे असेल ते उपसूचना मांडतांना अगर अनुमोदन देतांना. सर्वानाच अनेक वेळां बोलू दिलें, अगर भाषण राखून ठेवण्याचा हक्क दिला तर चर्चेची मर्यादाच राखली जाणार नाही, त्यांत खरी चर्चाच होणार नाही. मतें प्रकट न होतां डावपेंचच अधिक दिसून येतील, उपसूचना सभागृहाचे परवानगीने परत घेतली तरी ती मांडणारास अगर तिचे अनुमोदकास पुन्हा