पान:सभाशास्त्र.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ससाशास्त्र १२८ علي ع م م جي ميمي عمي علي सभासद बोलला म्हणून त्याच्या भाषणाचा विपर्यास होऊ नये व सभासद मागाहून बोलला म्हणून त्याने पूर्वी झालेल्या भाषणांचा विपर्यास करू नये. ही नीति पाळली जाईल अशी दक्षता अध्यक्षाने घेतली पाहिजे. कोणी तरी आधी बोललेच पाहिजे. प्रथम बोलण्यासाठी संधि मिळावी म्हणूनही स्पर्धा असते व शेवटी बोलण्याची संधि मिळावी म्हणूनही स्पर्धा असते. पहिल्यांत उभे राहून साधण्याची खटपट असते; तर दुसन्यांत जागी घट्ट बसून राहून साधण्याची खटपट असते !! अनेक वेळां या स्पर्धेमुळे कोणीच सभासद बोलण्यास उभा राहत नाही, असेही मजेदार प्रसंग अनुभवास येतात ! तात्पर्य, ज्यावर अन्याय झाला असेल त्या सभासदास खुलाशासाठी पुन्हा बोलण्याची संधि मिळावी. मात्र ही संधि म्हणजे पुन्हा साद्यंत भाषण नव्हे; नवे अगर: जुने मुद्दे मांडणे नव्हे. खुलासा म्हणजे जेवढा व जितका विपर्यास झाला असेल तेवढ्यापुरताच मर्यादित असावा व फक्त त्यांत वस्तुस्थितीचे कथन असावें. खुलासा म्हणजे नवीन वादविवादास सुरवात नसावी व त्याने अन्य सभासदांना पुन्हा खुलासा करण्याची आवश्यकता निर्माण होऊ नये. खुलाशावार खुलासे होऊ लागले तर चर्चेला गैरवळण लागते. सभेतील वातावरण मलिन हात । अप्रिय गोष्टी घडू लागतात. खुलाशावरच चर्चा होऊ लागुन मुख्य प्रश्न बाजूस पडतो, म्हणून अध्यक्षाने जरूर तेवढा खुलासा करण्यास परवानगी द्यावी व या संधीचा गैरफायदा सभासदास घेऊ देऊ नये. | खुलासा केव्हा करावाः–ज्या भाषणाने खुलाशाची आवश्यकता निर्माण होते ते भाषण संपल्याबरोबर खुलासा करू इच्छिणाच्या सभासदान उभे राहावे व आपणास खुलासा करावयाचा आहे असे अध्यक्षास सांगावे; व अध्यक्षाने परवानगी दिली म्हणजे खुलासा करावा. आक्षेपार्ह विधान सभेत होतांच पुष्कळ वेळां खुलासा करू इच्छिणारा सभासद उभा राहतो. पण जर बोलणारा सभासद, म्हणजे ज्याची सभा आहे तो सभासद, खाली बसून संधि देणार नाहीं तर खुलासा करू इच्छिणाराने खाली बसले पाहिजे व भाषण संपतांच उभे राहिले पाहिजे. जर बोलणारा सभासद संधि देईल तर अध्यक्षाने खुलासा करण्यास संधि द्यावी. खुलासा संपताच बोलणाच्या सभासदास आपलं भाषण सुरू करण्याचा अधिकार आहे. (५) उत्तर देण्याचा हक्कः-उत्तर देण्याचा हक्क म्हणजे त्याच प्रश्नाव