पान:सभाशास्त्र.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सक्षाशास्त्र १२६ कांहीं ठिकाणी नियम असतात व नियमाप्रमाणे तसा ठराव आला तर तो सभेपुढील प्रश्न होऊन त्यावर चर्चा होऊ शकते. संस्थेच्या हिताचे दृष्टीने त्याच सभेत घेतलेला निर्णय रद्द करणे इष्ट असेल, प्रतिष्ठेला धरून असेल तर सभेला तो बदलण्याचा हक्क आहे. बहुसंख्याक सभासदांनीं यादी देऊन ‘झालेला ठराव रद्द समजावा' अशा ठरावाची सूचना अध्यक्षाकडे दिल्यास अध्यक्षाने त्याचा विचार केला पाहिजे, यासंबंधी नियम नसेल तर अध्यक्षाने संस्थेचे हित, निर्णयाचे वेळची परिस्थिति, चालू परिस्थिति व संस्थेची प्रतिष्ठा लक्षात घेऊन आपला निकाल द्यावा. योग्य वाटल्यास नवीन ठराव मांडू द्यावा. अयोग्य वाटल्यास परवानगी नाकारावी. जेथे नियम असेल तेथे नियमाप्रमाणे निर्णय द्यावा. बहुतेक स्थानिक संस्थांतून नोटीस देऊन झालेला ठराव रद्द करता येतो. रद्द करून त्याचे जागी दुसरा पास करतां येतो. बहुसंख्याक सभासदांचे सह्यांची यादी देऊन रद्द करावयाचा ठराव व तो रद्द करणारा ठराव हे दोन्ही यादींत यावे लागतात. नियमाप्रमाणे यादी व नोटीस आणि नियमाप्रमाणे खास अगर साधारण सभा भरली असतां निर्णय बदलणारा अगर रद्द करणारा ठराव सभेपुढील प्रश्न होतो व त्यावर चर्चा होऊ शकते. । (४) एकदाच बोलण्याचा हक्क आहेः-सभेपुढे एकच प्रश्न चर्चेसाठी असतो म्हणून त्याचे चर्चेत वक्त्याला एकदाच बोलण्याचा हक्क आहे. चर्चेत ही मर्यादा नसेल तर कांहीं माणसेच वारंवार बोलतील. चर्चेला इष्ट ते वळण राहावे व त्यांत शिस्त व व्यवस्था राहावी या दृष्टीने एका सभासदाला सभेपुढील प्रश्नाबाबत एकदाच बोलण्याचा अधिकार असणे इष्ट आहे. या व्यवस्थेने अनेकांना संधि मिळते, अनेक दृष्टिकोन सभेपुढे येऊ शकतात, अध्यक्षाने नवीन सभासदाला प्रथम संधि देण्याची परंपरा आहे. तसेच तहकूब सभा असेल तर ज्याचे भाषण मागील सभा खंडित होतांना चालू असेल व तो जर चर्चेचे सुरवातीस हजर असेल, तर त्याचा भाषण चालू करण्याचा हक्क आहे. मात्र तो हजर पाहिजे. दुस-या वक्त्याचे नांव अध्यक्षाने घेऊन त्याने बोलण्यास सुरवात केली की हा हक्क नष्ट होतो. व नंतर त्याला चर्चेत भाग घेण्याचा अधिकार राहात नाहीं. मग तो बोलेल तर ते दुसरें भाषण होते, उपसूचनेची नोटीस द्यावयाची अगर मांडावयाची आहे असे सांगून मुख्य प्रश्नावर भाषण करावयाचे व नंतर उपसूचना न मांडतांच ते संपवावयाचें; कांहीं काळ