पान:सभाशास्त्र.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२३ सभानियमन व संचालन अगर पक्ष सभागृह सोडून गेला व या कृत्यावर सभागृहांत टीका झाल्यास नंतर त्याबद्दल खुलासा करण्याची संधि मिळणे योग्य आहे. सभात्याग करून अध्यक्षाचा अपमान केला या आक्षेपाला उत्तर देतांना काँग्रेसपक्षाचे नेते यांनी केलेले कृत्य अध्यक्षाचा अपमान नव्हता, तसा हेतूही नव्हता, अध्यक्षाचा निर्णय ऐकणे याचा अर्थ तो पसंत केलाच पाहिजे असा नाही असे सांगून, सभात्याग हे केवळ निर्णयाची नापसंतीदर्शक कृत्य होते, असा खुलासा केला व त्यावर मध्यवर्ती विधिमंडळांत अध्यक्षाने चर्चा होऊ दिली नाहीं. योग्यप्रसंगी व योग्य परिस्थितींत अध्यक्षाने वर्तनाबद्दल खुलासा करण्याची संधि सभासदाला व्यक्तिशः अगर पक्षाला दिली पाहिजे. तथापि केलेल्या खुलाशावर चर्चा नाहीं. सभेपुढे प्रश्न असेल तरच चर्चा होईल. (२) चर्चा एकाच प्रश्नावर होतेः-एका वेळी एकच प्रश्न सभेपुढे चर्चेसाठी असू शकतो. एकापेक्षा अधिक प्रश्नांवर चर्चा नाहीं. ठरावावर तह कुवीचा सूचना आली की, तहकुबीची सूचना सभेपुढील प्रश्न होतो व त्या-- वरच चर्चा होईल. चर्चातहकुबीची सूचना आली तर चर्चातहकुबी हा सभेपुढील प्रश्न होईल. ठरावांतील विषयाला डावलणारी उपसूचना सभेत केली गेली की, ती सभेपुढील प्रश्न होईल. जो सभेपुढे प्रत्यक्ष प्रश्न आला आहे. त्याच्यावरच चर्चा होईल. त्याचा निर्णय लागल्याशिवाय आधीच्या प्रश्नावर चर्चा नाहीं. ठराव व त्यावरील तहकुबीची सुचना अशा दोन्ही प्रश्नांवर एकदम चर्चा नाही. एका वेळी एकाच प्रश्नावर चर्चा, त्यावर निर्णय, नंतर जो प्रश्न सभेपुढे राहील त्यावर चर्चा त्याचा निर्णय असा चर्चाक्रम असतो. हा क्रम राखण्याने चर्चा सुलभ व व्यवस्थित होते. (३) निर्णित प्रश्नावर चर्चा नाहींः–ज्या विषयाचा निर्णय सभेनें घेतला आहे त्याबद्दल पुन्हा सभेपुढे प्रश्न येणे व चर्चा होणे गैर आहे, वज्य आहे. सभेचा निर्णय म्हणजे सभेचा पूर्ण विचार करून दिलेला अभिप्राय होय. या अभिप्रायाला काही तरी निश्चित, कांहीं तरी प्रतिष्ठा पाहिजे. त्याचबरोबर सभेचा निर्णय म्हणजे वज्रलेप नव्हे, कधीही न बदलणारा कायदा तो नव्हे. काही तरी काल एकदां घेतलेला निर्णय स्थिर राहिला पाहिजे, सभेने सकाळी एका विषयावर एक निर्णय घेतला व लागलीच संध्याकाळी तो बदलला तर त्यांत सभासदांचा लौकिक नाहीं. निदान त्या सभेत तरी तो बदलू नये, सभा, कार्यक्रमपत्रिकेतील विषय संपेपर्यंत चालते. ती अनेक