पान:सभाशास्त्र.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र १२२ त्यावर कोणालाही बोलतां येणार नाही. सभेपुढे प्रश्न कसा येऊ शकतो व तो चर्चेला पात्र असा सभेपुढील प्रश्न केव्हा होतो याचे विवेचन मागे आले आहे. सभा आपले निर्णयाने आज्ञा देते अगर मतप्रदर्शन करते. निर्णयाचे स्वरूप कसेही असले तरी सभेपुढे प्रस्ताव अगर सूचना निर्णयासाठी असली पाहिजे, तसे नसेल तर कोणालाही उठुन कांहीं बोलण्याचा अधिकार नाहीं. | ( १ ) सभेपुढे प्रश्न पाहिजेः–ठरावाची सूचना मांडणारा प्रथम बोलेलं पण त्याने वास्तविक सूचना प्रथम मांडून नंतर बोलले पाहिजे. तोच नियम उपसूचना मांडणारालाही लागू आहे, तथापि तो प्रसंगी प्रथम बोलता व नंतर उपसूचना मांडतो. हे नाममात्र अपवाद सोडून दिल्यास सभेपुढे प्रश्न आल्याशिवाय कोणालाही बोलतां येणार नाहीं व बोलणाराने सभेपुढील प्रश्नाबाबतच बोलले पाहिजे. सभेपुढील प्रश्नाबाबतच सभासदांना बोलण्याचा हक्क आहे. प्रधानमंडळाला अगर कार्यकारी मंडळाला प्रश्न विचारण्याचा हक्क सभासदांना आहे. तथापि भाषण करणे अगर बोलणें हें सभेपुढे निर्णयासाठी प्रश्न असेल तेव्हांच आहे. सभेच्या कार्यक्रमाबद्दल अगर अन्य खुलासे विधिमंडळांतून सरकारतर्फ करण्यांत येतात. धोरणे जाहीर करण्यांत येतात. तथापि या खुलाशावर अगर निवेदनावर चर्चा होऊ शकत नाही. त्यावर चर्चा करणे झाल्यास नियमानुसार नोटीस देऊन ठराव आणला पाहिजे. मग तो ठराव अविश्वासाचा असो अगर सभातहकुबीचा असो. कांहीं तरी ठराव येऊन सभेपुढे प्रश्न म्हणूनं आल्याशिवाय त्यावर चर्चा नाहीं. तोच नियम अन्य संस्थेच्या सभांना लागू आहे. कार्यकारी मंडळाचे खुलाशावर मोघम चर्चा करणे वज्ये आहे. तत्संबंधीं ठराव आला म्हणजे चर्चा योग्य ठरते. तसेच अधिकार सोडतांना खुलासे केले जातात. त्यावरही चर्चा वज्र्य आहे. एखाद्याने अधिकार सोडला, राजिनामा दिला व खुलासा केला तर त्यावर आपले म्हणणे मांडण्यासाठी खुलासा करण्याची संधि जे अधिकारावर राहिले आहेत त्यांना मिळणे योग्य आहे. तथापि त्यावर सभागृहांत सर्वसाधारण चर्चा होणे अयोग्य आहे. तसेच चर्चेत पुष्कळ वेळां ताबडतोब खुलासा करता येत नाही. अशा प्रसंगी मागाहून खुलासा करण्याची संधि असावी. मात्र खुलासा हा खुलासा असावा. नवीन वादविवाद सुरू करण्याचे त्याचे स्वरूप नसावें. असल्या खुलाशावर चर्चा करणे अयोग्य आहे. अध्यक्षाचे निर्णयावर नाखूष होऊन एखादी व्यक्ति