पान:सभाशास्त्र.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२१ संसानियमन व संचालन सभासदाला भाषण करण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ या संधीचा अगर हक्काचा फायदा घेऊन प्रत्येक विषयावर काही तरी बोलून, प्रत्येक विषयाला उपसूचना आणून, तहकुबीच्या सूचना आणून, अगर अन्य रीतीनें सभेतील चर्चा लांबविणे हे केव्हाही अयोग्य आहे. काही ठिकाणी भाषणाला कालमर्यादा नसते. उदाहरणार्थ बिलावरील चर्चेत भाषणाला कालमर्यादा नसते, तेथे तासानुतास बोलून कालहरण करणे अयोग्य आहे. जेथे वक्त्याचा हेतु केवळ सभाकायत बुद्धिपूर्वक अडथळा करणे आहे तेथे योग्य भाषणाची मर्यादा ओलांडली जाते. असल्या प्रसंगी अध्यक्षाला वक्त्यास भाषण बंद करण्यास सांगण्याचा अधिकार आहे. तथापि अध्यक्षाने हा अधिकार, वक्त्याचा हेतु अगदी उघडउघड स्पष्ट झाल्याशिवाय वापरू नये. । ( ११ ) समितीतील उल्लेखः–समितीमध्ये काय घडलें हें वक्त्याने सांगणे योग्य नाही. समितीत वातावरण अनौपचारिक असते. पुष्कळ वेळा तडजोडीचे दृष्टीने प्रयत्न होत असतात. सुचना अनौपचारिक रीतीने केल्या जातात. सदरहु प्रसंगी कोण काय बोलते याचा उल्लेख मुख्य सभेत करणे गैर आहे. समितीचा जो रिपोर्ट असेल त्यांत जेवढे असेल तेवढ्याचाच उल्लेख करता येतो. समितींत काय घडले, कसे घडलें, यासंबंधीचा उल्लेख करणे गैरशिस्त मानले पाहिजे. रिपोटातील मजकुराचा उल्लेख रिपोर्ट सभेपुढे आल्याशिवाय करणे योग्य नाही. कार्यकारी मंडळांत काय घडले, स्टैंडिंग कमिटींत काय घडलें, वगैरे चर्चा करणें, अगर तत्संबंधीं वक्त्याने उल्लेख करणे, म्हणजे त्या त्या समितीत झालेल्या चर्चेचे पुन्हा उत्थापन करणे आहे. तेथील गोष्टीच्या खरे-खोटेपणाबद्दल वाद उत्पन्न करणें आहे. हे सर्व अयोग्य व अप्रस्तुत होय. त्या त्या समितीचा जो अधिकृत रिपोर्ट असेल तेवढाच भाषणाचा विषय होऊ शकतो, त्याबद्दलचा उल्लेख प्रस्तुत ठरतो. (१२) अध्यक्षाचे निर्णयावर टीका नसावीः- सभासंचालनाचे कामीं अध्यक्षाने वेळोवेळी दिलेले निर्णय हे अखेरचे मानले पाहिजेत; म्हणून त्यांचा निषेधात्मक अगर टीकात्मक उल्लेख भाषणांत नसावा. अध्यक्षावर अविश्वासाचा, निंदाव्यंजक अगर त्यास दूर करण्याबाबत योग्य रीतीनें व नियमानुसार ठराव जेव्हां येईल त्या प्रसंगी अध्यक्षाच्या मागील निर्णयावर टीका करणें प्रस्तुत ठरते. चर्चा-नियमनः—सभेपुढे प्रश्न असल्याशिवाय त्यावर चर्चा नाहीं व