पान:सभाशास्त्र.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र १२० .. . नसेल, तर ते दाखविणे गैर आहे. आरोप सत्य असले तरी सार्वजनिक वाब ती नसल्यास ती रास्त व योग्य टीका होत नाही. व्यक्तीचें सार्वजनिक वर्तन ही सार्वजनिक बाब आहे. सर्व सार्वजनिक कृत्ये, ग्रंथ, नाटके, सभा, राज्यकारभार, सामाजिक गोष्टी इत्यादि टीकेचे विषय होऊ शकतात. रास्त व योग्य टीका प्रामाणिक असली पाहिजे. प्रसंगाचा दुरुपयोग करून वैयक्तिक राग अगर द्वेष तींत आलेला नसावा. अयोग्य हेतु चिकटविणे गैर आहे. ज्या भाषेत ती होईल तिचे तीव्रतेवरून, तिचे कडवटपणावरून, वक्त्याच्या प्रामाणिकपणाचा कयास कायदा करतो. संरक्षित प्रसंगः–विधिमंडळांतील भाषण हे जसे कायदेशीर इलाजापासून संपूर्ण संरक्षित आहे तसे अन्य कोठील भाषण नाहीं, तथापि कांहीं ठिकाणच्या भाषणाबाबत थोडेसे पण अप्रत्यक्ष संरक्षण वक्त्याला मिळते, ज्या ठिकाणीं वक्त्याला आपले कायदेशीर, नैतिक अगर सामाजिक कर्तव्य बजावण्यासाठीं भाषण करावे लागते, एखादे विधान करावे लागते, तेथे जर प्रामाणिक बुद्धीने प्रसंगाचा दुरुपयोग न करतां अगर जादा फायदा न घेतां ते केले असेल, तर न्यायालयें संरक्षण देतात. पण भाषण करणाराला तो तसला प्रसंग होता हैं शाबीत करावे लागते. खटला होतो. कायदेशीर इलाज होतात. पण संरक्षण देण्यास योग्य प्रसंग होता हे सिद्ध झाल्यास संरक्षण मिळते. त्याचा दुरुपयोग झाला म्हणजे अप्रामाणिक टीका होती असे कोर्ट मानते व भाषण गुन्हा ठरतो, ज्या सभेत विधान झाले असेल त्याचा वृत्तान्त मुद्दाम स्वखर्चाने छापणे, वाटणे, हे अप्रामाणिक हेतूचा पुरावा ठरतो. विधिमंडळांतील भाषणप्रसंग हा संपूर्ण संरक्षित (Occasion of absolute privilege) आहे. भाषण कसेही असो त्याबद्दल कोटला कांहीं करण्यास अधिकारच नाही. फिर्यादच चालणार नाही. अन्य ठिकाणी कर्तव्यानुसार केलेले भाषण बदनामीकारक असून सुद्धा ते करणे प्रसंगानुसार कर्तव्य होते असे शावीत झाल्यास व अप्रामाणिकपणा शाबीत न झाल्यास गुन्हा ठरत नाही. असले प्रसंग मर्यादित संरक्षणाचे प्रसंग (Occasion of qualified privielge ) मानले जातात. - (१०) व्यत्ययात्मक नसावेः- बुद्धिपूर्वक सभेच्या कामांत सारखा अडथळा व व्यत्यय आणण्याचे हेतूने भाषण करणे हे आपल्या भाषण करण्याच्या हक्काचा दुरुपयोग करणे आहे, हे मना आहे. नियमानुसार प्रत्येक