पान:सभाशास्त्र.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११९ सभानियमन व संचालन disturb the state; therefore the debate that tends to it cannot; for it must be propounded and debated before it can be enacted") प्राचीन परंपरा व प्रथा यांना अनुसरून केलेली ही कॉमन्ससभेची १६६७ मधील घोषणा भाषणस्वातंत्र्याची आवश्यकता उत्कृष्टपणे दर्शविते. योग्य व रास्त टीकाः—विधिमंडळाव्यतिरिक्त अन्य ठिकाणच्या सभेतील भाषणाबद्दल वक्त्याला कायदेशीर इलाजापासून संरक्षण कोठेही दिलेले नाही. लोकल बोर्ड, नगरपालिका, कंपनीच्या सभा, अन्य संस्थेच्यौँ सभा अगर सार्वजनिक सभा यांतून केलेले भाषण गुन्हा होत असेल तर, त्याबद्दल खटला होऊ शकतो, अन्य कायदेशीर इलाज होऊ शकतात. तेथील भाषणांत जर योग्य व रास्त टीकेच्या मर्यादा संभाळल्या असतील तर ते भाषण गुन्हा अगर बदनामीकारक ठरणार नाही. भाषणांतील विधान सत्य असेल तर ते केल्याबद्दल दिवाणी दावा चालणार नाही. पण फौजदारी कोर्टात खटला झाला तर नुसते विधान सत्य आहे एवढे शाबीत करून भागणार नाही तर ते सार्वजानिक हितार्थ केले हे शाबीत केले पाहिजे, विधान सत्य असले पाहिजे अगर ते करणाराने प्रामाणिकपणे सत्य आहे असे समजून केले असले पाहिजे; व शिवाय सार्वजनिक हितार्थ ते केले इतकें शाबीत केले म्हणजे ते भाषण बदनामीकारक ठरणार नाही. स्वतःचे न्याय्य हितसंरक्षणार्थ केलेले सत्यकथन आक्षेपार्ह नाहीं व बदनामीकारक होऊ शकत नाहीं. रास्त व योग्य टीका म्हणजे वस्तुस्थितीवर आधारलेले सार्वजनिक बाबींवरील मतप्रदर्शन होय. सत्यकथन करणें अगर वस्तुस्थितिविधान करणे हे मतप्रदर्शन नव्हे. मतप्रदर्शन म्हणजे वस्तुस्थितीच्या आधारावर सांगितलेलें मत, म्हणून टीका करतांना ज्या वस्तुस्थितीचा ( Facts ) आधार घेऊन टीका करावयाची आहे ती यथातथ्य सांगितली पाहिजे. त्यांत विपर्यास असतां कामा नये. त्या वस्तुस्थितीशी टीकेचा संबंध असला पाहिजे. वस्तुस्थितींतून टीकेंतील मत अगर विधाने योग्य अनुमानाने काढतां येतील अशी ती असली पाहिजेत. ज्यावर मत द्यावयाचें- ती वाच सार्वजानिक पाहिजे. सार्वजनिक हितसंबंध त्यांत प्रस्तुत असला पाहिजे. भाषणांत केवळ वैयक्तिक हल्ला करणें गैर आहे. वैयक्तिक गुणदोष दाखविण्यांत जर सार्वजनिक महत्त्व नसेल, ती बाब जर सार्वजनिक हितार्थ सांगण्याची जरूरी