पान:सभाशास्त्र.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र ११८ तसे भाषण झाल्यास अगर तसा उल्लेख असल्यास अध्यक्ष सभानियमाप्रमाणे योग्य ते इलाज करतो. तेवढा भाग सभासदास परत घेण्यास सांगतो अगर तो भाग अधिकृत वृत्तान्तांतून कमी केला जातो. अधिकृत वृत्तान्त (Official Report) आलेल्या मजकुराबद्दलही सभासदाविरुद्ध कोणालाही कांहीही कायदेशीर इलाज करता येत नाहींत. वर्तमानपत्रांतून आलेल्या भाषणाचे रिपोर्टाबद्दल वक्त्याविरुद्ध इलाज करता येणार नाहींत व भाषणाचा रिपोर्ट अगर सभेचा रिपोर्ट जर सरळ व यथातथ्य (Fair and Accurate) असेल तर वर्तमानपत्राविरुद्धही कांहीं करता येणार नाही. मात्र एवढेच भाषण सभासदानें अगर अन्य कोणीं छापून प्रसिद्ध केले तर प्रकाशकावर इलाज होऊ शकतो. हे व एवढे भाषणस्वातंत्र्य फक्त विधिमंडळांतच असते व असणे योग्य आहे. जर हे स्वातंत्र्य त्यांना नसेल तर अनर्थ होईल. सत्ताधीशांचे फावेल. लोकमताला योग्य वाव मिळण्यासाठी, लोकप्रतिनिधींना चर्चा करतांना कायदेशीर इलाजाची धास्ती नसली पाहिजे. कांहीं बोलले तर खटला होण्याचा संभव आहे, या वातावरणांत योग्य व पूर्ण चर्चा होणार नाहीं व सर्व दृष्टींनी चर्चा झाल्याशिवाय योग्य निर्णयही शक्य नाही. विधिमंडळाच्या स्वातंत्र्यासाठी इतके भाषण-स्वातंत्र्य अत्यंत अवश्य आहे. * जें पार्लमेंट करील ते कायदेशीर निःसंशय असणार, पण पार्लमेंटचा कायदा होण्यासाठी कोणी तरी ते मांडले पाहिजे, चर्चिले पाहिजे, त्याशिवाय ते कायद्यांत परिणत होणार नाही. जर परिणामी होणारा कायदा कायदेशीर व कोणालाही त्याविरुद्ध तक्रार करता येणार नाही, तर आधीं पण अवश्य होणारी चर्चाही तशीच आहे व त्याविरुद्ध कोणाला तक्रार करता येणार नाहीं. पार्लमेंटला जितकें स्वातंत्र्य आहे तितकें सभासदांना असले पाहिजे. जर पार्लमेंटच्या कायद्याने राज्यास धोका नाही, तर ज्या चर्चेतून तो जन्मतो त्यापासूनही नाही. कारण चर्चेशिवाय, प्रस्तावाशिवाय तो कायदाच होत नाहीं.” (“ No man can doubt, but whatever is once enacted is lawful; but nothing can come into an Act of Parliament, but it must be first affirmed or propounded by somebody. So that if the Act can wrong nobody, no more can the first propounding. The members must be as free as the Houses; an Act of Parliament cannot