पान:सभाशास्त्र.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११७ सभानिय मन व संचालन सर्व उल्लेख गैरशिस्त आहेत. म्युनिसिपालिटी म्हणजे गुंडांचा कारभार' असा सभासदाने उल्लेख करणे अयोग्य आहे. संस्था लाळघोट्यांची आहे, ‘भाडोत्र्यांची झाली आहे हे सर्व उल्लेख अप्रतिष्ठा करणारे आहेत, म्हणून वर्ण्य मानले पाहिजेत, (९) गुन्हास्वरूपी नसावेः-भाषणांतील भाषा सभ्य तर पाहिजेच, पण त्याबरोबरच भाषण गुन्ह्याला उत्तेजन देणारें अगर कोणाची बदनामी करणारे नसावें. भाषा सभ्य ठेवून बदनामी अगर अन्य गुन्हा होऊ शकतो. वक्ता हा जें बोलेल त्याबद्दल तो कायद्याने जबाबदार आहे. तथापि जी सभा संघटित संस्थेची उघड काम करणारी, ‘प्रामाणिकपणे कायदेशीर गोष्टींची चर्चा करण्यासाठी अगर तत्संबंधी विचार करण्यासाठी जमली आहे तेथे कायद्याविरुद्ध भाषण अगर अन्य कांहीं होणार नाही हे पाहण्याची जबाबदारी नैतिकदृष्ट्या अध्यक्षावर आहे. भाषणस्वातंत्र्य हा बहुमोल हक्क आहे. तसेच तो एक शस्त्र आहे, त्याचा दुरुपयोग होता कामा नये. भाषणस्वातंत्र्य में प्रगति व आत्मसंरक्षण यांसाठी आहे. मनुष्याच्या विचारांना वाव असावा. प्रत्येक व्यक्तीला आपला अनुभव व अभिप्राय बोलून दाखविण्याचा हक्क असणे इष्ट आहे. एकाचा अनुभव दुसरा सांगू शकत नाही. कारण अनुभव ही वैयक्तिक बाब आहे. होणाच्या कायद्याचा अगर झालेल्या कायद्याचा परिणाम काय होईल, राज्यकारभाराबाबत व्यक्तिशः काय अनुभव येतो, नगरपालिकेचा कारभार व्यक्तीला कसा वाटतो, संस्थेच्या धोरणाने सभासदाचे जीवनावर काय परिणाम होणार हे समजणे इष्ट व जरूर आहे. भाषणस्वातंत्र्य नसेल तर मन मारले जाईल, व्यक्तित्व करपेल, त्याची वाढ होणार नाहीं, अन्यायांना वाचा फुटणार नाहीं. भाषण-स्वातंत्र्यः–भाषण-स्वातंत्र्य म्हणजे वाटेल तें व वाटेल तेथे वाटेल ते बोलण्याची मुभा नव्हे. शांतपणे सभाकार्य चालू असतां आग आग' अगर * साप साप ' ओरडून गोंधळ करणे म्हणजे भाषणस्वातंत्र्य नव्हे. भाषण म्हणजे निंदा नव्हे. भाषणांत रास्त व योग्य टीकेच्या मर्यादा संभाळल्या गेल्या पाहिजेत. सभेत भाषण केल्याने वाटेल ते बोलण्याचा हक्क प्राप्त होत नाही. फक्त विधिमंडळांत सभासदाने केलेल्या भाषणाबद्दल त्याचेवर खटला होत नाहीं अगर त्याचेविरुद्ध त्याबाबत दावा चालत नाहीं. तथापि तेथेहि राजद्रोही अगर बदनामीकारक असे बोलण्यास मना आहे व