पान:सभाशास्त्र.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र ११६ सभासदाचा अपमान करू नये, अप्रतिष्ठा करू नये हे जसे इष्ट तसेच त्याने आपल्या भाषणांत अन्य संस्थांची अप्रतिष्ठा करू नये. रास्त टीका करण्यास त्याला संपूर्ण स्वातंत्र्य आहे व असले पाहिजे. विधिमंडळांचे नियमांतून अन्य विधिमंडळावर अयोग्य व अप्रतिष्ठा करणारी टीका मना आहे, ही प्रथा योग्य आहे. (६) वैयक्तिक टीका नसावीः-सभासदांव्यतिरिक्त व्यक्ति सभेत असू शकत नाहीत म्हणून त्यांचेवर वैयक्तिक टीका केव्हांही वज्र्य आहे. त्यांच्या सार्वजनिक कृत्याबाबतसुद्धा टीका रास्त व प्रस्तुत पाहिजे. ज्यांच्यावर टीका होत आहे ते आपली बाजू मांडण्यास हजर असू शकत नाहींत हैं लक्षांत घेऊन अध्यक्षाने त्यांच्यावर अन्याय होणार नाहीं व आरोप करणारी अपमानकारक व अप्रतिष्ठा करणारी टीका होणार नाही अशी काळजी घेतली पाहिजे, 1. राजावर टीका वज्यं पण राज्यकारभावर टीका करणे हे केव्हाही योग्य आहे. व्यक्तिशः अधिकारी टीकेला पात्र नाही, पण त्याचे कार्य, त्याचा कारभार हा टीकेचा योग्य विषय होऊ शकतो. | (७) न्यायालयावर अयोग्य टीका नसावीः- न्यायालयावर अप्रतिष्ठा करणारी टीका भाषणांत नसावी. निर्णय तात्त्विकदृष्टया चर्चेण्यासः हरकत नाही. त्यापासून होणारे परिणाम याकडे लक्ष वेधणे अगर त्यावर चर्चा करणे अयोग्य नाही. तथापि तो अप्रामाणिक आहे अगर गैरशिस्तपणे दिला आहे अगर मिळविला आहे अशी टीका अप्रतिष्ठा करणारी आहे. (८) संस्थेवर अयोग्य टीका नसावीः--स्वतःच्याच संस्थेची अप्रतिष्ठा करणारा उल्लेख अगर चर्चा अयोग्य आहे. सभेचा निर्णय हा सभेचा निर्णय आहे. त्याला प्रतिष्ठा आहे. सभेचा अगर सभेच्या निर्णयाचा अवहेलनापूर्वक अगर अपमानकारक उल्लेख गैरशिस्त आहे. सभासदच जर नांवे ठेवू लागले, अप्रतिष्ठा करू लागले तर जनतेत संस्थेची किंमत कमी होते. तिची प्रतिष्ठा लयाला जाते. विधिमंडळांतून सभेचा अगर सभेच्या निर्णयाचा गैरशिस्त अगर अप्रतिष्ठा करणारा उल्लेख अगर चच नियमाने मना आहे. विधिमंडळाने केलेले कायदे यांचाही अयोग्य उल्लेख गैर आहे. जेव्हा निर्णय बदलण्याचा ठराव अगर कायदा रद्द करण्याचा प्रश्न सभेपुढे असेल त्या वेळी कोणत्याही प्रकारे उल्लेख करण्यास हरकत नाही. मात्र तो प्रस्तुत असला पाहिजे, ‘मूर्ख कायदा’, ‘अप्रयोजक निर्णय’, ‘स्वतःचे नाक कापणारे वर्तन है।