पान:सभाशास्त्र.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ १५ सभानियमन व संचालन - - गैर नाहीं. ‘श्रीयुत...यांचे नेतृत्व अत्यंत तेजस्वी आहे म्हणूनच त्यांकडे राष्ट्र पाहू शकले नाहीं.' ‘विवेकाशी यांची मैत्री फारशी नाहीं.' ‘सत्याची जाणीव असून भागत नाहीं, ते बोलून दाखवितां आले पाहिजे, याला श्री. क्ष हे काय करणार, अनुयायांनी मार्गे जाणे, विचार न करणे व केवळ नेत्यावर श्रद्धा दाखवून वागणे हा श्रेष्ठ धर्म आहे, धर्म आचरणाच्या विरुद्ध कसे बोलावें हीं व असली विधानें सभ्य आहेत. जे शब्द उघड उघड शिवराळ आहेत, अपशब्द आहेत अगर अश्लील आहेत, जेथे केवळ अपमान करण्याचा, बेअब्रू करण्याचाच हेतु आहे, पाणउतारा करणे हेच जेथे उद्दिष्ट दिसत आहे, तेथे अध्यक्षाने आक्षेप यथार्थ मानून वागले पाहिजे. वादविवादांत अनेक वेळा प्रक्षोभक, अपमानकारक, असभ्य भाषा वापरली जाते व वातावरण गरम होते. अनेक प्रसंगी शब्दांवरून पुढे प्रगति होऊन मारामारीपर्यंत प्रसंग येतात. अध्यक्षाने आक्षेपित शब्द परत घेण्यास तर सांगितलेच पाहिजे, पण प्रसंगी वक्त्याने दिलगिरी व्यक्त केली पाहिजे अशीही आज्ञा दिली पाहिजे; व योग्य दिलगिरी व्यक्त केली असता सर्वांनी प्रकरण तेथे संपविले पाहिजे. प्रत्यक्ष सभेत अगर सभागृहांत कोणाचाही अपमान होणार नाहीं अगर सभाकार्य होत असतां उत्पन्न झालेल्या गैरसमजाचा विपर्यास होऊन मारामारी, आव्हान, प्रतिआव्हान अगर दंड थोपटण्यापर्यंत वेळ येऊ नये म्हणून, अध्यक्षाने दक्ष राहिले पाहिजे. जें जें आक्षेपार्ह वर्तन सभाकायत झाले असेल अगेर त्याच्यांतून त्याचा उगम असेल तर अध्यक्षाने जो सभासद दोषी असेल त्याचेकडून योग्य तें परिमार्जन करून घ्यावे. सभेतील भांडणें अगर विरोध सभा संपताच संपला पाहिजे. खाजगी मैत्री अगर खाजगी संबंध यांत त्याने बिघाड होऊ नये. खिळाडूवृत्तीने सर्वांनीं वागले पाहिजे, रस्त्यांतील भांडणें गृहांत येऊ देऊ नयेत. त्याचप्रमाणे सभागृहांतील भांडणे रस्त्यावर जाता कामा नयेत. कॉमन्ससभेत सभासंमतीने अध्यक्ष सांगेल त्याप्रमाणे सभासदांनीं भांडण न मिटविले तर भांडणारांना अटकेंत राहावे लागते व सभेच्या निर्णयाप्रमाणे वागू व भांडण चालू ठेवणार नाही असे आश्वासन दिल्याशिवाय सुटका होत नाही. सार्वजनिक कार्यातील भांडणांतून व्यक्तिद्वेष निर्माण होऊन शहरांवर अगर देशांवर अनर्थ कोसळल्याची उदाहरणे सर्वत्र आहेत, (५) अन्य संस्थांची निंदा नसावीः-सभासदानें ज्याप्रमाणे दुस-या