पान:सभाशास्त्र.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र ११४ --- -

भाषणाचा अगर शब्दांचा विपर्यास करणे, ‘असत्यवादी' म्हणणे, लबाडीचा आरोप घेणे हे सर्व गैर व असभ्य आहे. (४) भाषा सभ्य असावीः–वक्त्याची भाषा सभ्य असावी, चर्चेत असभ्य शब्द अगर असभ्य विधान केले जाणार नाही, याबद्दलची दक्षता अध्यक्षाने घेतली पाहिजे. एखादा शब्द अगर विधान असभ्य (Unparliamentary ) आहे हा आक्षेप ताबडतोब घेतला पाहिजे. आक्षेपार्ह शब्द अगर विधान वक्त्याचे तोंडून बाहेर पडतांच आक्षेप घेतला पाहिजे. वक्त्याचे भाषण संपल्यानंतर अगर बराच वेळ भाषण झाल्यानंतर आक्षेप घेतल्यास अध्यक्षानें तो विचारांत घेऊ नये. आक्षेपित शब्द अध्यक्षाने ऐकले असल्यास प्रश्नच नाहीं. ऐकले नसल्यास अगर अर्धवट ऐकले असल्यास आक्षेपकास तो शब्द संपूर्णपणे उच्चारण्यास सांगावें. आक्षेपित शब्द अगर विधान वक्याने केले अशी खात्री वक्त्यास विचारून अगर सभेकडे पृच्छा करून करून घ्यावी. लघुलेखक अगर वृत्तांत टिपून घेणारे असतील तर त्यांची टिपणे पाहावीत. खाली झाली व उच्चारलेले शब्द अगर विधान असभ्य आहे असे अध्यक्षाचे मत झाले म्हणजे आक्षेप योग्य मानून अध्यक्षाने वक्त्यास आक्षेपित भाग परत घेण्यास सांगावे व वक्त्यानें तो परत घेतला पाहिजे. यांत त्याची प्रतिष्ठा आहे. न घेतल्यास अध्यक्षाने त्यास भाषण बंद करण्यास सांगावें अगर प्रसंगी सभा सोडण्यासही सांगावें. अध्यक्षाचे निर्णयावर चर्चा नाही व तो अखेरचा असतो. तुच्छतादर्शक, अपमानकारक, बदनामीकारक शब्द हे असभ्य शब्द आहेत. असत्य कथन’, ‘गैरसमज करणारे कथन', ‘विपर्यास करणारे कथन' हे सर्व आक्षेपार्ह आहेत. ‘सभेला बनविले’, ‘पोरकट विरोध’, ‘स्वातंत्र्याचे ढोंगी भक्त’, ‘खल पुरुष’, ‘निर्लज्ज’, ‘उद्धट’, ‘गुंड’, ‘पाजी', ‘टिनपाट’, ‘वक्तृत्व’, ‘देशद्रोही', “खुनी’, ‘सभ्य गृहस्थास न शोभणारे वर्तन, ‘भांडकुदळ’, ‘लुच्चेगिरी’, ‘शरम आणणारे कृत्य’, ‘खोटी माहिती दिली’, ‘कमी जास्ती करून माहिती दिली’, ‘नालायक लोकांचा प्रतिनिधि’, ‘खुळचट', ‘आत्म्याची विक्री करणारे’, ‘नाममात्र मुसलमान आहे, हे शब्द असभ्य म्हणून निरनिराळ्या विधिमंडळांतील अध्यक्षांनी ठरविले आहे. सभासदांच्या वर्तनावरील टीका रास्त असेल, त्यांत उपरोध, व्यजंना, मर्मभेद असेल अगर प्रसंगी कटुता, तीव्रता असेल तर तेवढ्याने भाषण असभ्य ठरत नाहीं. वारंवार व असंबद्ध भाषण करून सभेच्या कामांत अडथळा करीत आहेत' असे म्हणणे