पान:सभाशास्त्र.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११३ समानियमन व संचालन

    • •••••••••••••••••••

चर्चात्मक उल्लेखही वर्ण्य आहे. गुन्ह्याचे कृत्य निषेधार्थ असेल पण जोपर्यंत गुन्हा करणा-याने गुन्हा केला असे शाबीत झाले नाहीं, कोटाने निकाल दिला नाही तोपर्यंत त्याचा निषेध करणे अयोग्य आहे. निर्णयापूर्वी आरोपीचा निषेध करणे गैर आहे व तद्विषयक चर्चाही वयं आहे. (३) वैयक्तिक आरोप नसावतः वैयक्तिक आरोप भाषणांत असू नयेत. चर्चेत वैयक्तिक भाग नसावा म्हणून कॉमन्ससभेत सभासदांचा उल्लेख नांवाने करीत नाहींत. अमुक मतदारसंघाचा सभासद असा साधारणपणे उल्लेख करण्यात येतो. नामदार सभासद मॅन्चेस्टर’, ‘नामदार आणि विद्वान् सभासद ऑक्सफोर्ड’, ‘नामदार मंत्री परराष्ट्रखाते' याप्रमाणे सभासदांचा उल्लेख होतो. मतदारसंघ अगर मतदारसंघ व हुद्दा अगर व्यवसाय असे त्या उल्लेवाचे स्वरूप असून सभासदाचे नांवाने कधीच उल्लेख करण्यात येत नाहीं. सभासदाचे नांवाचा उल्लेख अध्यक्षाने सभासदास सभागृहाबाहेर घालविण्याचे ठरविले म्हणजे करावयाचा असतो. Naming a member ‘सभासदास नांवाने संबोधिले' याचा अर्थ त्याला बाहेर घालविण्याची आज्ञा दिली, त्याचे सभासदत्व तहकूब केले असा आहे. नांवानें न संबोधण्याची प्रथा अन्यत्र कोठेही नाहीं. लॉर्डीचे सभेतही आतां नाही. या प्रथेनें वैयक्तिक भाव थोडा कमी होतो हे खरें, तथापि तेवढ्याने तेथेही काम भागत नाहीं. सभासदांचा उल्लेख जेथे अधिकार असेल, अगर स्पष्ट भूमिका असेल तेथे त्या दृष्टीने करावा. ‘विरोधकांचे म्हणणे असे आहे की, “स्थायी समितीच्या सभापतीचे म्हणणे असे आहे की’, ‘खात्याचे म्हणणे असे आहे की याप्रमाणे संबोधिल्याने नुकसान न होतां फायदाच होतो. नामदार मित्र श्रीप्रकाश, ‘मेहेरबान सभासद श्री. काळोखे नुसते ‘श्रीयुत’ अगर ‘राजश्री संत' याप्रमाणे नांवाने उल्लेख करण्याची प्रथाही निरनिराळ्या संस्थांतून नियमान्वयें अगर संकेताने असते. गौरवाने संबोधणें हें वादविवादांत इष्ट असते. कसाही उल्लेख केला तरी तो सभ्य असावा व वैयक्तिक आरोप भाषणांत नसावेत. भाषणाचा उद्देश मन वळविणे व मत आपले वाजूस करून घेणे आहे. या दृष्टीने सभ्य व मधुर भाषा नेहमीच परिणामकारक ठरते. वाईट हेतूचा आरोप, जे मांडले आहेत त्यापेक्षा निराळे हेतु आहेत असा आरोप करणे, प्रतिपक्षाच्या स...८