पान:सभाशास्त्र.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ सभाशास्त्र वेळी मुख्य प्रश्नाच्या गुणदोषांचे विवेचन सर्वस्वी अप्रस्तुत आहे. अमुक पद्धतीने सभेचे काम चालावे हा प्रश्न सभेपुढे असतां, जे काम अगर कार्य व्हावयाचे असेल त्याच्या गुणदोषांबद्दल बोलणे गैर आहे. अमुक विधान असभ्य आहे असा निकाल दिला अगर अमुक उपसूचना गैरलागू ठरविली अगर अन्य कांहीं आक्षेप मान्य केले अगर फेटाळले अगर अध्यक्षाचा सभासंचालनविषयक कोणताही निर्णय, हे चर्चेचे विषय होऊ शकत नाहींत. तो निर्णय मान्य करून चर्चा व वादविवाद झाला पाहिजे; त्यासंबंधींचा चर्चात्मक असा कांहीही उल्लेख प्रस्तुत ठरणार नाही. अर्थात् ज्या वेळी सभेपुढे अध्यक्षावर अविश्वासाचा ठराव असेल अगर त्याला दूर करण्याचा ठराव असेल, त्या वेळी त्याचे निर्णय ठरावाचे आशयानुसार प्रस्तुत ठरतील. । चर्विचर्वण नसावेंः-वक्त्याचे भाषण सभेपुढील प्रश्नाला धरून पाहिजे व अध्यक्षाने या नियमाचा अर्थ योग्य प्रसंगी व्यापक केल्याने बिघडत नाहीं. अप्रस्तुत भाषण करणारास सूचना द्यावी, न ऐकल्यास त्यास भाषणच बंद करण्यास सांगण्याचा अधिकार अध्यक्षास आहे. तसेच तेच तेच पुन्हा बोलणे अगर तेच तेच मुद्दे अगर कोटिक्रम स्वतःचे अगर दुस-याचे पुनः पुन्हा मांडणे हेही एका दृष्टीने अप्रस्तुत आहे म्हणून ते अध्यक्षाने बंद केले पाहिजे. तसा अधिकार त्याला बहुतेक विधिमंडळांतून असतो. कॉमन्ससभेत आहे. चर्चा म्हणजे चर्विच्चर्वण नव्हे. (२) कोर्टापुढील बाब वज्र्यः-कोटॉपुढे असलेल्या बाबींचा ऊहापोह करू नये. न्यायालयांत जी गोष्ट निर्णयासाठी आहे त्यावर चर्चा करणे गर आहे. न्यायालयापुढे असल्यामुळे निर्णय घेता येत नाही आणि या स्थितीत ठराव आणून चर्चा करणे म्हणजे न्यायादानावर अयोग्य दडपण आण, त्यावर अप्रत्यक्ष व अयोग्य रीतीने परिणाम घडविणे यासारखे होते, नोंदलेल्या संस्थांच्या सभा असोत अगर न नोंदलेल्या संस्थांच्या सभा असोत हा संकेत मानणे . इष्ट आहे. सभेचा वृत्तांत प्रसिद्ध होणार नाही येवढ्याने हा सक झुगारून देणे योग्य ठरणार नाही. विधिमंडळांतून याबाबत स्पष्ट नियम आहेत. स्थानिक स्वराज्यसंस्था व अन्य कायद्याने निर्माण केलेल्या संस्थांतून जेथे प्रत्यक्ष नियम नाहीं तेथेसुद्धा हा संकेत पाळला जातो. न्यायालयापुढे असणाच्या बाबींचा ऊहापोह करणे कोटांचा अपमान करण्यासारखे होते व म्हणून तो गुन्हा होतो, असली बाब चर्चेत येऊ शकत नाहीं. तिचा