पान:सभाशास्त्र.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सार्वजनिक सभातंत्र सभाः-निश्चित विषयाचा विचार करण्यासाठी एकत्र आलेला व नियमाने वागणारा लो कसमह म्हणजे सभा, एकत्र येण्याचा, जमण्याचा हक्क आहे व लोक एकत्र आले एवढ्याने तो जमाव सभा होत नाहीं. बाजारांत लोक एकत्र येतात पण ती सभा नव्हे. डोंबान्याचे खेळ पाहण्यासाठी लोक जमतात पण ती सभा नव्हे, नाटक अगर बोलपट पाहण्यासाठी लोक जमतात पण तो जमाव सभा नव्हे. रस्त्याचे नाक्यावर एखादा प्रचारक भाषण करील पण तेथेही सभा नाहीं. समूहाचे नियमन करणारा अध्यक्ष नसेल तर तेथे सभा नाहीं. ६६ ज्याची सभा निनायक । तो एक मूर्ख ॥” या दासोक्तींतील भावार्थ स्पष्ट आहे. विषय निश्चित पाहिजे, नियमन करणारा पाहिजे, नियमांप्रमाणे काम चालले पाहिजे. ही लक्षणे असतील तर सभा आहे. या दृष्टीने पुराण, कीर्तन हैं। सभा होऊ शकत नाहीं. स्मशानांत जमलेल्या मंडळीपुढे भाषणे झाली तरी ती मंडळी सभा नव्हे. सार्वजनिक सभाः-सार्वजनिक बाबीचा विचार करण्यासाठी जाहीर आमंत्रण देऊन बोलावलेली अगर भरलेली व जत भाग घेण्याचा हक्क हजर असलेल्या सर्वांना आहे अशी सभा सार्वजनिक सभा होय. संस्थेच्या सभांना हजर राहण्याचा हक्क फक्त सभासदांनाच आहे. संस्थेच्या मार्फत सार्वजनिक प्रश्नाचा विचार करण्यासाठी जर सार्वजनिक सभा भरविली असेल, तर त्यांत भाग घेण्याचा संस्थेच्या सभासदांबरोबर इतरांनाही हवा आहे. विशिष्ट मत असलेल्यांची सभा असेल, तरी तेवढ्याने, ती खाजगी होत नाहीं. ती सार्वजनिक सभाच ठरते. अमुक व्यक्तीला मानपत्र द्यावें याला अनुकूल असणा-यांनीच सभेला यावे, त्यांचीच सभा आहे असे जरी निमंत्रणपत्रिकेत असले तरी ती सार्वजनिक सभा ठरते. * शहरांतील घरमालकांची सभा घरपट्टीवाढीबद्दल विचार करण्यासाठी भरणार आहे ही सभासुद्धां सार्वजनिक सभा ठरते. तेथे प्रवेश जरी घरमालकांनाच असला तरी त्याने सभेच्या स्वरूपांत फरक पडत नाहीं; मात्र घरमालकांची जर संघटित संस्था असेल, व तिची ससा तिच्याच सभासदांपुरती असेल, तर ती खाजगी सभा