पान:सभाशास्त्र.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१११ सभानियमन व संचालन . अध्यक्ष व सभा दोघांनाही संबोधणे अयोग्य नाहीं. वर्षातून १।२ कामें करण्यासाठी भरणाच्या संस्थेच्या सभांतूनही त्याचप्रमाणे वक्त्याने वागल्यास वावगे होणार नाही. मात्र ज्यांचे काम सारखें चालू असते व सभा वारंवार भरूनच ते व्हावयाचे असते, अशा संस्थांच्या सभांतून अध्यक्षालाच फक्त संबोधून वक्त्याने बोलावे हे इष्ट आहे. येथील विधिमंडळांतून सर्वत्र हीच प्रथा आहे व नियमही आहेत. कॉमन्ससभेत हीच प्रथा आहे व सभेला उद्देशून बोलणें गैर मानले जाते. लॉडाचे सभेत मात्र वक्ता केवळ सभासदांनाच उद्देशून बोलतो. बहुतेक स्थानिक स्वराज्यसंस्थांतून अध्यक्षांना उद्देशून बोलावें असा नियम आहे, नसेल तेथे तशी प्रथा पाडणे इष्ट आहे. भाषणाच्या मर्यादाः (१) वक्त्याचे भाषण जो प्रश्न सभेपुढे आहे त्याला धरून असले पाहिजे, अप्रस्तुत भाषण बंद करा असे सांगण्याचा अधिकार अध्यक्षाला आहे. सभेपुढे ठराव असेल तर ठरावावर, तहकुबीची सूचना असेल तर त्या सूचनेवर, एखादें कलम असेल तर त्यावर, उपसूचना असेल तर त्यावर म्हणजे त्या त्या प्रश्नाला धरून बोलले पाहिजे. कलम विचारासाठी असेल तर एकंदर विलासंबंधी बोलणे, अप्रस्तुत आहे. तहकुबीची सूचना आली असतां चर्चेच्या मुख्य विषयावर बोलणे गैर आहे. प्रस्तुतताः-बिलावरील चर्चेच्या अनेक अवस्था असतात. जी अवस्था चालू असेल तिला धरून भाषण असले पाहिजे. ज्या बावीचा निकाल झाला असेल तिजबद्दल बोलणें अप्रस्तुत आहे. जी चालू प्रश्नाशी निगडित नाहीं, पण पुढे येणार आहे अगर कार्यक्रमपत्रिकेंत आहे, एवढ्याने तिजबद्दलचा उल्लेख अगर तिजवरील चर्चा प्रस्तुत ठरत नाही. मुख्य प्रश्नाचा निर्णय घेतल्यानंतर आनुषंगिक बाब सभेपुढे असेल तर पुन्हा मुख्य प्रश्नांतील विषयासंबंधीं बोलणें अप्रस्तुत आहे. “सायकल-कर बसवावा' हा ठराव पास झाल्यानंतर त्याची तपशीलवार योजना करण्यासाठी कमिटी नेमावी असा प्रश्न सभेपुढे असतां पुन्हा सायकलकराचे अनिष्टतेसंबंधी अगर इछतेसंबंधी बोलणे, गैर आहे. तसेच नेमलेल्या सभासदावर तात्त्विक आक्षेप घेण्याचे निमित्त करून पुन्हा तोच वाद उकरून काढणेही अप्रस्तुत आहे. काही प्रसंगी प्रश्न विचारार्थ कमिटीकडे सोपवावा असा मोघम ठराव सभेपुढे असल्यास प्रश्नाच्या गुणदोषांसंबंधीं वादविवाद करणेही अप्रस्तुत ठरते. कमिटी किती सभासदांची असावी या प्रश्नाचे चर्चेचे