पान:सभाशास्त्र.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र १ १० वक्त्याने भाषण करण्याची सर्वसामान्य प्रथा आहे. सार्वजनिक सभेत अध्यक्ष व सभासद अगर श्रोते या उभयतांना संबोधून बोलणे योग्य आहे. तेथील विषय नेहमी सामान्य स्वरूपाचा असतो वादविवाद आणि विशेषतः तपशीलवार वादविवाद में सार्वजनिक सभेचे प्रमुख अगर प्राथामक लक्षण नसते. तेथील श्रोते हे ओतेच असतात. त्यांची संख्या व बोलणारांची संख्या यांत साहाजेक महदन्तर असतें. ५॥१० बोलणारे तर हजारोंनी ऐकणारे असतात. बोलण्याची भूमिका अगर मनीषा घेऊन येणारे नाममात्र असल्यामुळे वक्ता बोलत असतांना अडथळा अगर प्रश्नोत्तरांचे प्रसंग थोडे असतात. अफाट समाज असल्यामुळे होणारे वक्तृत्व कोणा व्यक्तीला संबोधून क्वचितच असते. वैयक्तिक अगर पक्षविषयक भावसुद्धा तेथे विशेष तीव्रतेने प्रदर्शित करण्याचा प्रसंग फारसा येत नाही. कारण व्यक्ति अगर गट अफाट श्रोतृवृंदांत अस्पष्ट होतो. याचे उलट मर्यादित सभासद असलेल्या संस्थेचे सभेत असते. ज्याच्यावर टीका करावयाची असते त्या व्यक्ति अगर पक्ष समोर स्पष्टपणे व व्यक्तित्वाने पृथक्भावाने समोर दिसत असतात. विरोधक संघटित असून भूमिकेच्या जाणिवेने विरोधाला उत्सुक व तयार असतात. या परिस्थितींत वक्त्याने सभासदांस संबोधून बोलण्याने अडथळा, प्रश्नोत्तरें, कडवटपणा अधिक उत्पन्न होण्याचा संभव असतो. चर्चाविषयाच्या तात्त्विक वातावरणांतून वैयक्तिक हेवेदावे, मानापमान, उखाळ्यापाखाळ्या वगैरेनीं मलिन झालेल्या वातावरणांत ओढली जाते. हे टळण्याच्या दृष्टीने वक्त्याने अध्यक्षाला उद्देशून, अध्यक्षाला संबोधून भाषण केल्याने इष्ट ते वातावरण बरेच अंशीं उपलब्ध होते. अध्यक्षास उद्देशून बोलावयाचे असल्याने भाषणाला इष्ट त्या मर्यादा बसतात. अन्य सभासदांना सरळ उद्देशून भाषण नसल्याने तोंडातोंडीचे प्रसंग कमी येतात. अध्यक्ष हा मधे घेतल्याने टीकेंत एक अप्रत्यक्ष भाव उत्पन्न होतो, व त्यामुळे तींतील तीव्रताही कमी होते. सरळ बोलण्याने होणारा परिणाम व अध्यक्ष मधे घालून होणारा परिणाम यांत फरक असतो पण त्यामुळे तात्त्विक हानि कांहींच होत नाही. उलट चर्चा उच्च वातावरणांत होण्यास मदतच होते. अध्यक्षाला उद्देशून भाषण असल्याने साहजिक अध्यक्ष जागृत राहतो व नियमानुसार काम चालविण्याकडे त्याचे अधिक लक्ष राहते. वरील विवेचनाचे दृष्टीने सार्वजनिक सभेत वक्त्यान