पान:सभाशास्त्र.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०९ सभानियमन व संचालन अवश्य असते व हा अधिकार अध्यक्षाचा आहे. उपस्थित प्रश्नांवर निर्णय देण्यासाठीं अगर अन्य कारणांसाठी अध्यक्ष बोलण्यास उभा राहतांच वोलणाच्या वक्त्याने बसलेच पाहिजे. अध्यक्ष बसतांच वक्त्याला पुन्हा आपले भाषण नियमानुसार चालू करता येते. अध्यक्ष उभा राहतांच, सभागृहांत सर्वत्र शांतता झाली पाहिजे. सर्वांनी त्याचे म्हणणे बसून शांततेने ऐकलें पाहिजे, त्याचा निर्णय मान्य केला पाहिजे. । कायद्याचे मुद्देः—संचालनाविषयक आक्षेप (Points of order) अगर कायद्याचा मुद्दा ताबडतोब उपस्थित केला पाहिजे. प्रसंग उपस्थित होतांच त्याकडे अध्यक्षाचे लक्ष वेधण्याचा हक्क प्रत्येक सभासदास आहे. सभासदाने कायद्याचा मुद्दा अगर आक्षेप उपस्थित केल्याबरोबर बोलणाच्या वक्त्याने खाली बसावे व तो न बसल्यास अध्यक्षाने त्यास आज्ञापावें. मुद्दा अगर आक्षेप उपास्थित करणाराने काय आक्षेप अगर मुद्दा आहे एवढेच सांगावे, त्यावर भाषण करू नये. कायद्याचे मुद्दयावर अगर आक्षेपावर अध्यक्षाचे परवानगीशिवाय चर्चा करता येणार नाही आणि विशेष महत्त्वाचा अगर कांहीं तात्त्विक अंश त्यांत असल्याशिवाय अध्यक्षाने चर्चेला परवागी देऊन वेळ घालवू नये. अध्यक्षाने दिलेला निर्णय हा अखेरचा मानला पाहिजे. नियमानुसार निकाल असेल व नियम योग्य व सर्वसामान्य न्यायाचें कल्पनेला धरून असतील तर कोर्टसुद्धां अध्यक्षाचे निर्णयांत बदल करणार नाही. | कायद्याचे मुद्दे अगर आक्षेप साधारणतः तीन स्वरूपाचे असतात : ( १ ) अधिकारातिक्रम झाला आहे (ultra vires ) जें कार्य होत आहे ते अधिकाराबाहेरचे आहे. आणलेला ठराव, उपसूचना अगर बिल संस्थेच्या कार्यक्षेत्रांत येत नाहीं. नियमान्वयें अगर घटनेने जे अधिकार दिले असतील त्यांत होणारे कार्य पडत नाहीं, (२) नियमाविरुद्ध होणारे कार्य आहे, जे स्पष्ट नियम आहेत त्याविरुद्ध होत आहे म्हणून गैरकायदा आहे, नोटीस अगर अन्य सभासंचालनाबाबत नियमाविरुद्ध होत आहे म्हणून आक्षेपार्ह ( ३ ) संस्थेच्या हिताविरुद्ध, सामान्य न्यायविषयक कल्पनांविरुद्ध अगर द्वेषबुद्धीने होणरें कार्य होत आहे म्हणून आक्षेपार्ह. कांटेकोर दृष्टीने नियमाप्रमाणे आहे. तथापि उघड अन्याय होत आहे. या परिस्थितीत आक्षेप घेणे योग्य आहे. संबोधन-पद्धतः-‘अध्यक्ष महाशय व सभासदहो' याप्रमाणे संबोधून