पान:सभाशास्त्र.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र १०८ प्रमाणे अर्धवर्तुळाकार समारचना असली म्हणजे पक्षभेद तितका स्पष्ट होत नाही. लागून सभासद वसत असलेमुळे एकांत एक मिसळलेले दिसतात व यामुळे कोणत्या भागाकडे वळून कोणते शब्द परिणामाचे दृष्टीने बोलावे हैं। वक्त्यास पुष्कळ वेळां ठरविणे कठीण असते. विशेषतः मध्ये बसलेले कोणीकडे कलतील याची खात्री नसते. परिणामी विचारावानिमय होण्याचे दृष्टीने प्रथमदर्शनीं कोण कोणत्या मताचा आहे हे स्पष्ट होईल अशी सभारचना -असावी, वरील विवेचन ज्या संस्थेच्या सभा वारंवार भरतात अशांनाच विशेषेकरून लागू आहे. ज्या संस्थेच्या सभा वर्षांतून २।३ वेळांच अगर त्याहीपेक्षा कमी वेळां भरतात त्यांना लागू करण्याचे विशेष प्रयोजन नाहीं. असल्या सभा नाममात्र विचारविनिमयाच्या असतात. तेथे जागेच्या दृष्टीने वक्त्याने अध्यक्षाजवळ मंचावर उभे राहून बोलणे अनेक वेळां इष्ट ठरते. भाषणांतील व्यत्ययः-अध्यक्षाचे आज्ञेनुसार वक्ता बोलत आहे तोपर्यंत सभागृह त्याचे आहे, सभा त्याची आहे असे मानणे योग्य आहे. (He is in possession of the House.) त्याला अडथळा करून दुसच्या सभासदाला बोलतां येणार नाहीं. सूचना अगर उपसूचना करता येणार नाहीं अगर खुलासासुद्धा करता येणार नाही. बोलणाच्या वक्त्याला काही माहिती विचारावयाची असेल कांहीं खुलासा विचारावयाचा असेल, कांही शंका अगर प्रश्न विचारावयाचा असेल, तर पृच्छकाने आपले जागी उभे राहावे; पण जर बोलणारा वक्ता खाली बसून संधि न देईल (Does not give way ) तर प्रश्न विचारणाराने राली बसले पाहिजे. पृच्छकाने उभे रहावें व अध्यक्षाने आज्ञा केल्यास प्रश्न विचारावा अगर खुलासा करावा; तथापि बोलणारा वक्ता जर खाली बसून संधि न देईल तर अध्यक्षानें पृच्छकोस आज्ञा देऊ नये. एका वेळी दोन सभासद उभे राहून बोलणें हें सभेच्या कायद्याविरुद्ध आहे. जो वक्ता बोलत आहे, ज्याची सभा आहे, तो जोपर्यंत नियमानुसार बोलत आहे तापर्यंत त्यास खाली बैस असे सांगण्याचा कोणालाही अधिकार नाहीं व जर कोणी त्याला अडथळा करील तर त्याचे निवारण अध्यक्षाने केले पाहिजे. | अध्यक्षाचा अग्रहकः–जेव्हां अध्यक्ष उभा राहील त्या वेळी बोलणा-या वक्त्याने खाली बसलेच पाहिजे. चर्चा चालू असतां अनेक संचालनविषयक प्रश्न उपस्थित होतात, कायद्याचे मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे निर्णय देण