पान:सभाशास्त्र.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०७ सभानियमन व संचालन बोलावयाचे असल्यास त्यास आपली जागा सोडून खास वक्त्याची जागा (Tribune ) म्हणून केलेली असते तेथे यावे लागते. हा ‘भाषणमंच अध्यक्षाचे पुढे व सभासंमुख असून थोडा उंच असतो. संस्थेच्या सभा कोठे भरावयाच्या हे सामान्यतः ठरलेले असते. ज्या संस्थांच्या सभासदांची संख्या आटोपशीर असते व सभासदांची बसण्याची व्यवस्था ठरलेली आहे तेथे सभासदाने आपल्या बसण्याचे जागी उभे राहून बोलणे योग्य आहे. उदाहरणार्थ स्थानिक स्वराज्यसंस्था, विधिमंडळे वगैरे स्वरूपाच्या संस्थांतून सभासदसंख्या मर्यादित असते व साधारणपणे सभासदही गटागटानें बसतात. अधिकारारूढ पक्ष अध्यक्षाचे उजवे बाजूस व विरोधी पक्ष डावे बाजूस बसतो. अशा व्यवस्थेत बसण्याचे 'जागी उभे राहून विरोधी पक्ष समोर असतांना बोलणे चर्चेचे दृष्टीने विशेष अनुकूल असते. आपला पक्ष आपले मागें अगर बाजूस आहे हा विश्वास वक्त्याला उत्तेजित करीत असतो. विरोधी पक्ष डोळ्यांत तेल घालून न्यून काढण्यासाठी समोर टपून बसला आहे या जाणिवेनें भाषणांत जबाबदारी उत्पन्न होते. त्याजबरोबर स्वमतप्रस्थापनेसाठीं वक्त्याला आव्हान दिल्यासारखे होते. बोलणारा व अन्य सभासद एकाच पातळींत येतात व अलगपणाचा अगर श्रेष्ठ-कनिष्ठ भाव तेथे उत्पन्न होत नाही. या व्यवस्थेने चर्चेत विचाराला प्राधान्य मिळण्यास मदत होते. वक्ता अध्यक्षापुढील भाषणमंचावर उभा राहून बोलू लागला म्हणजे न कळत तो सभाभावापासून थोडा अलग होतो. उच्च स्थानावरून बोलत असल्याने त्याचाही परिणाम त्याचे मनावर होतो. सर्व सभा त्याचे पुढे असते. त्याचे सहकारी, त्याचे पक्षसभासद् त्यापासून दूर राहतात. या व्यवस्थेत वक्त्याच्या भाषणांत भावनांना अधिक उत्तेजन मिळते असा अनुभव आहे. आणि जर या सभांना प्रेक्षक हजर असतील तर वक्ता सभासदांकडे लक्ष देऊन त्यांची खात्री करण्यापेक्षा प्रेक्षकांच्याकडे पाहून त्यांच्यावर परिणाम करण्याचे दृष्टीने भाषण करीत असतो हाही अनुभव मोठमोठ्या संस्थांच्या परिषदांतून—अधिवेशनांतून येतो, म्हणून विचारप्रधान कार्य करणा-या संस्थांच्या (Deleberation Bodies ) सभेतून भाषणमंच नसावा व सभासदाने आपले जागी उभे राहून बोलावे, व याच दृष्टीने समारचना असावी. अध्यक्षाचे दोन्ही बाजूस दोन पक्ष व मधे मोकळी जागा अशी रचना पक्षसंघटनेला विशेष अनुकूल असते. कोण कुणाचा हे नक्की कळते व वक्ता त्या दृष्टीने बोलू शकतो. उलट या लांबट रचनेऐवजी नाला