पान:सभाशास्त्र.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र १०६ दुस-याने तयार केलेले भाषण वाचणे म्हणजे स्वतः चर्चेत भाग न घेतां भाडोत्री म्हणून अगर ( Proxy ) म्हणून आपली भूमिका करून घेणे आहे. चर्चेत स्वतःचे म्हणून काही विचार सभासदाने मांडले पाहिजेत. जेथे कळकळ आहे, तळमळ आहे तेथे अनुरूप असे शब्द वक्त्याला सुचतातच. लेखी भाषणाने चर्चेचे विडंबन होते व तत नकलीपणा येतो. * भाषाः–जेथे सर्व लोक एकच भाषा बोलतात तेथे भाषेचा प्रश्नच उपस्थित होत नाही. पण जेथे अनेक भाषा बोलणारे लोक आहेत व ते संस्थेचे सभासद आहेत त्या ठिकाणीं वक्त्याने कोणत्या भाषेत बोलावे हा प्रश्न आहे. संस्थेची अमुक एक अशी अधिकृत भाषा ठरलेली असेल व ती जर वक्त्यास चांगल्या रीतीने बोलता येत असेल अगर त्या भाऐंत आपले म्हणणे श्रोत्यांना समजेल अशा रीतीने मांडता येत असेल, तर त्या अधिकृत भाषेत त्याने बोलले पाहिजे. ती येत नसेल अगर चांगली येत नसेल तर त्याने आपले मातृभाषेत, अगर ज्या भाषेत बोलल्याने बहुसंख्य सभासदांना आपले म्हणणे समजेल त्या भाषंत ती येत असल्यास बोलावे. संस्थेची भाषा ठरलेली नसेल तर वक्त्यास भाषा-स्वातंत्र्य असावे व श्रोतृवृंदाने त्यास अडथळा करू नये. वक्त्याची मनीषा आपले म्हणणे श्रोत्यांस पटवावे अशीच असते व त्या दृष्टीने तो भाषेचा स्वीकार करतो. वक्त्यास विशिष्ट भाषेत बोलण्याचा आग्रह श्रोतृवृंदाने केल्यास त्या भाषेबद्दल त्यांचे प्रेम अगर अभिमान व्यक्त झाला तरी त्या योगें चर्चेला मदत न होतां उलट सभेत अशांतता होण्याचा संभव वाढतो. सार्वजनिक सभेत सुद्धा या दृष्टीने वक्त्याला स्वातंत्र्य असले पाहिजे, मुख्य वक्त्याचे मराठीत भाषण होऊन अध्यक्षाने केवळ आभाराचे शब्द मराठींत उच्चारल्याने सभेची समाप्ति दंगलींत झाल्याचे उदाहरण घडलें आहे. वक्ते व श्रोते यांनी भाषाविषयक अभिमान अस्थानीं व अप्रसंगी धरूं नये व यांत सभाकार्य साधते. स्थानः—सार्वजनिक सभेत वक्त्याने सभामंचावर येऊन, अध्यक्षाचे वैजळ उभे राहून अगर भाषणासाठी खास केलेल्या आसनावरून (Rostrum) भाषण करावे असा उल्लेख पूर्वीच केला आहे. सामान्यतः संस्थेच्या सभेत जेथे सभासद बसला असेल तेथे त्याने उभे राहून भाषण करावे असा प्रघात असतो. येथील स्थानिक स्वराज्यसंस्था, विधिमंडळे या सर्वांत हाच प्रघात आहे. कॉमन्ससभेतही हीच प्रथा आहे. कांहीं देशांतील विधिमंडळांतून सभासदास