पान:सभाशास्त्र.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०५ सभानियमन व संचालन चर्चा व विचारविनिमय हा सभेचा प्राण होय. चर्चा व विचारविनिमयाचे दृष्टीने भाषणे वाच हीनच नव्हे तर निरर्थकही आहे. लेखी भाषण म्हणजे मागील प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे कांहीं कल्पना करून लिहिलेलें; व त्यांत सभेत जे कांहीं झाले असेल अगर होत असेल त्याचा समावेश होऊ शकत नाहीं. पूर्वग्रहांचा अभिमान न धरतां जें खरोखर युक्तीला पटेल, मनाची खात्री करील तें स्वमताभिमान अगर पक्षाभिमान सोडून स्वीकारण्याची तयारी असणे ही चर्चेत भाग घेणाच्या सभासदांची तात्त्विक भूमिका असली पाहिजे. या तात्त्विक भूमिकेला किंबहुना वादविवादाच्या मौलिक सिद्धान्ताविरुद्ध व विसंगत अशी लेखी भाषण वाचण्याची प्रथा आहे. जें तादात्म्य व जी मनोमनता वक्ता व श्रोते यांच्यांत असावयास पाहिजे ती येथे उपलब्ध होत नाही. यासंबंधीचे अधिक विवेचन मागील प्रकरणांत केलेच आहे. कॉमन्ससभेत लेखी भाषण वाचण्यास मनाई आहे. त्याचे कारण ती प्रथा वादविवादाचे तात्त्विक भूमिकेशी (Repugnant to the true theory of debate ) विसंगत आहे असेच मानले जाते. येथील मध्यवर्ती विधिमंडळांत लेखी भाषण करण्यास परवानगी आहे. बहुतेक प्रांतिक विधिमंडळांतून तशी परवानगी नाहीं. स्थानिक स्वराज्यसंस्थांतून याबाबत क्वचितच नियम आहेत. तथापि भाषण वाचणे हे जरी नियमाविरुद्ध नसले तरी ते गैरसोयीचे व निरर्थक ठरते; परिणामाच्या दृष्टीने ते हिणकस होय असाच अनुभव येतो. प्रत्येक वक्ता उभा राहून निबंध वाचू लागला तर कठीण प्रसंग येईल व चचाही होणार नाहीं. वक्ता वाचू लागला म्हणजे स्वाभाविकपणे सभेत अशांतता निर्माण होते. म्हणून वक्त्यानें भाषण करावे हा संकेत पाळला जाईल असे नियंत्रण अध्यक्षाने घालणे अनेक दृष्टींनीं इष्टच ठरते. जेव्हा एखादें महत्त्वाचे धोरण जाहीर करावयाचे असेल, एखादा महत्त्वाचा खुलासा करावयाचा असेल अगर एखादा प्रस्तुत व अनुरूप उतारा वाचून दाखवावयाचा असेल तेथे अर्थात् वक्त्याला तसे करण्यास केव्हाही मोकळीक असली पाहिजे, वक्त्याने बोलतांना स्मरणार्थ लेखी टिपणे ठेवण्यास कांहींच हरकत नाहीं व त्यांचा योग्य उपयोगही तो करू शकतो. कित्येक वक्ते आपले वक्तृत्व म्हणजे अनेक उता-यांचे संकलन असे त्याचे स्वरूप करून टाकतात, हेही योग्य नाहीं. गैरहजर सभासदांचे लांबलचक भाषणात्मक पत्र वाचणे हेही गैर होय. भाषण स्वतःच केले पाहिजे व ते स्वतःचेच असले पाहिजे. दुसन्याचे भाषण अगर