पान:सभाशास्त्र.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०३ सभानियमन व संचालन wwwww तो ज्याचें नांव घेईल त्याने बोलावें. योग्य ती चर्चा व्हावी व सर्व पक्षांना न्याय मिळावा म्हणून इष्ट तो क्रम त्यानेच ठरविला पाहिजे, कोणी बोलावे हे ठरविण्याचा अधिकार जर अध्यक्षास नसेल व तें सभेने बहुमताने ठरवावे असे असेल तर अनर्थ होईल. बहुमतवाला पक्ष अल्पमतवाला पक्षास संधि देईल अशी खात्री नाही. नव्यांना उत्तेजन मिळेल अगर संधि मिळेल याचा भरंवसा नाहीं. सत्यवादी वक्त्यापेक्षां लोकप्रिय वक्त्याला सभामंच लाभून अनेक विचारसरणींना वाव मिळणार नाही. विधिमंडळांतून दोन सभासद उभे राहिले असतां जो नवीन व ज्याने अजून तोंड उघडलें नाहीं अशास प्रथम संधि देण्याची परंपरा आहे. पूर्वी कॉमन्स सभेत एका वेळी एकापेक्षा अधिक सभासद उभे राहिले व प्रथम बोलण्याचा हक्क प्रत्येक सांगू लागला व अध्यक्षाचा । निर्णय मान्य नसला तर सभा ठराव करून निर्णय देई; पण आतां अध्यक्ष ज्याचें नांव घेईल त्यानेच बोलावे व बाकीच्यांनीं बसावे असा शिरस्ता सर्वमान्य झाला आहे. अध्यक्षाचा निर्णय सर्व मानतात. अध्यक्ष एकदां या पक्षाचा व नंतर त्या पक्षाचा वक्ता याप्रमाणे साधारणपणे क्रम ठेवून बोलण्यास पाचारण करतो. उमरावसभेत असा पेचप्रसंग निर्माण झाल्यास अजूनही सभा ठराव करून निर्णय देते. व्यवस्था, शिस्त व न्याय या तिन्ही दृष्टींनी कोणी बोलावे हे ठरविण्याचा अधिकार अध्यक्षासच असावा व विधिमंडळांतून हा अधिकार स्पष्ट दिलेला असतो. बोलण्यासाठी उभे राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे पण जो सभासद अध्यक्षाचे नजरेत येईल (Catches the Speaker's eye ) व ज्याचे नाव अध्यक्ष उचारील त्यानेच बोलावे व बाकीच्यांनी ताबडतोब खाली बसलेच पाहिजे. • एकानेच बोलावेः—सभा ही विचारविनिमयासाठीं-निर्णयासाठीं जमलेली असते. तेव्हां शांतता ही तिची पार्श्वभूम आहे. ती असेल तर सभेचे काम शक्य होईल. म्हणून सभेत एका वेळी एकानेच बोलले पाहिजे व बाकीच्यांनी ते शांततेने ऐकले पाहिजे. सभेत इतरांनी किती जरी हलक्या आवाजांत कुजबूज केली तरी शांतता नष्ट होते. सभा म्हणजे अनेक गप्पा-मंडळे नव्हेत. जो बोलत असेल, त्याची ती. सभा सर्वस्वी असली पाहिजे. सभेचे लक्षावर त्याचा अग्रहक्कच नव्हे तर संपूर्ण हक्क आहे. त्याचाच बोलण्याचा हक्क असल्यामुळे तो बोलत आहे तोंपर्यंत सभा त्याची आहे ( He is in possession of the House ).