पान:सभाशास्त्र.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

? ܘ ' सभानियमन व संचालन ठराव मांडतो. तो ठराव मांडणार आहे या शर्तीवरच अध्यक्षाने त्याला बोलू द्यावे. नाही तर त्याने भाषण करून ठराव न मांडल्यास अध्यक्ष बनला जातो. यावर उत्कृष्ट उपाय म्हणजे अध्यक्षानें वक्त्यास प्रथम ठराव मांडण्यास सांगावें व नंतर भाषण करण्यास आज्ञापावे. पुष्कळ वेळा असेही घडतें कीं वक्षा भाषण करतो व प्रामाणिकपणे ठराव मांडण्याचे विसरतो. कार्यक्रमपत्रिकेत ठराव असेल त्याप्रमाणें अगर नोटीस दिली असेल त्याप्रमाणे ठराव मांडला पाहिजे. त्यांत कांहीं शाब्दिक अगर किरकोळ बदल करणे झाल्यास त्यास अध्यक्षाची परवानगी पाहिजे. महत्त्वाचा बदल ठराव मांडणारास ठरावांत करणे असेल व त्यांत नोटिशीची शर्त असेल तर तो करता येणार नाहीं. | अनुमोदनः–ठरावाच्या सूचनेस अनुमोदन असावे व तेही अधिकारी सभासदाने द्यावे. येथील विधिमंडळात ठरावाला अनुमोदनाची आवश्यकता नाही; तथापि, सर्व स्थानिक स्वराज्यसंस्थांतून व अन्यत्र कायद्याने अस्तित्वात असलेल्या संस्थांतून अनुमोदनाची आवश्यकता ठेवलेली असते. इंग्लंडांतील उमरावसभेत ठराव अगर उपसूचना यास अनुमोदनाची जरूरी नाही, उलट कॉमन्ससभेत दोहांसही अनुमोदनाची आवश्यकता आहे. नियम नसेल तर, अनुमोदनाचा संकेत इष्ट आहे. जेथे अनुमोदन अवश्य आहे तेथे ते अधिकारी सभासदाकडूनच मिळाले पाहिजे. अनाधिकारी सभासदानें अनुमोदन दिल्याने झालेले गैरकार्य, दोष समजून येतांच अगर आक्षेप घेतला जातांच ते अध्यक्षाने दुरुस्त करून घ्यावे. अनाधिकारी सभासदाने अनुमोदन दिले म्हणून पास झालेला ठराव चर्चेचे वेळी कोणी आक्षेप घेतला नाहीं तर गैरकायदा होत नाहीं. अध्यक्षाने मांडलेल्या सूचनेस अनुमोदन लागत नाही, | सभेपुढील प्रश्नः–नियमानुसार सूचना मांडली गेली व ती अनुमोदन मिळाले म्हणजे ती अध्यक्षाने चर्चेस घालावी. विधिमंडळांतून ठराव मांडल्या नंतर अध्यक्ष ठराव वाचून दाखवितो व नंतर चर्चा सुरू होते. अध्यक्षाने ‘सूचना चर्चेस घातली आहे’, ‘सूचनेवर सभेनें चर्चा करावी' असे जाहीर केल्याशिवाय सभेला चर्चा करता येणार नाहीं. अध्यक्षाने सभेपुढे सूचना चर्चेसाठी ठेवल्यावर ती ‘सभेपुढील प्रश्न (Question before the House ) होतो. मग त्यावर बोलण्याचा प्रत्येक सभासदाला हक्क आहे. सभेपुढील प्रश्न म्हणजे नियमानुसार जी सूचना (motion ) केली गेली व जी अध्यक्षाने चर्चेस घातली ती सूचना होय. विषयावर ज्या नियमानुसार चर्चा