पान:सभाशास्त्र.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साशास्त्र १ ० ० पाहिजे. तात्पर्य, प्रत्येक चर्चेचा विषय चालना अगर सूचना ( motion ) होऊन सभेपुढे आला पाहिजे. ठराव मांडणैः–ठराव मांडण्याचा अगर त्याची सूचना मांडण्याचा हक्क प्रत्येक सभासदाला आहे. सभेचा निर्णय ठरावाने व्यक्त होतो व तो होण्यासाठीं सभेपुढे अधिकारी सभासदानें तो ठराव मांडला पाहिजे, त्याची सूचना सभेपुढे ठेवली पाहिजे. जो सभासद नाहीं अगर ज्याला काही कारणाने अगर नियमामुळे ठराव मांडण्यास अधिकार नाही त्याने ठराव मांडल्यास ते गैर होय, तथापि आक्षेप मात्र ताबडतोब घेतला पाहिजे. ठराव पास झाल्यानंतर घेतलेला आरोप व्यर्थ होय. त्याचप्रमाणे बरीच चर्चा झाल्यानंतर, घेतलेला आक्षेपही समर्थनीय ठरत नाही. तथापि चर्चा चालू असतां आक्षेप आला तर पुन्हा योग्य सभासदाकडून तो ठराव मांडून घेऊन सभाकार्य नियमानुसार करता येते. काही संस्थांतून ज्याने ठरावाची नोटीस दिली असेल त्यालाच तो मांडतां येतो असा नियम असतो. तेथेही बरीच चर्चा झाल्यानंतर आक्षेप आल्यास दुसन्या अधिकारी सभासदास तो मांडण्यास सांगितले तर त्यांत कांहींच अन्याय होत नसल्याने अध्यक्षाने तसा निर्णय देऊन काम चालू, ठेवल्यास गैर होणार नाहीं. पुष्कळ वेळां नोटीस देतांना सभासदत्व असते, अधिकार असतो, पण सभेच्या वेळेला तो नसतो; तेथेही आक्षेप उशिरा आल्यास अध्यक्षाने वरीलप्रमाणेच निर्णय द्यावा. मात्र आक्षेप ठराव मांडण्यापूर्वी अगर मांडतांच आला तर अध्यक्षाने नियमानुसार ठराव मांडण्यास सभासद पात्र नाही असा निर्णय दिला पाहिजे. जर नोटिशीची शर्त असेल व दुस-या कोणी सदर्ह ठरावाची नोटीस दिली नसेल तर तो ठराव गळता सामान्यतः विशिष्ट व मौलिक प्रश्नाखेरीज करून अन्य विषयाचे ठरावाचा नोटीस एका सभासदाने दिली व तो गैरहजर असून त्याने दुसन्या " सदास ठराव मांडण्यास लेखा अधिकार दिला असेल तर अध्यक्षाने ठराव मा ण्यास त्यास परवानगी द्यावी. याप्रमाणे बहुतेक विधिमंडळांचा रिवाज जाह: ठराव मांडणाच्या अधिकारी सभासदानें “मी अशी सूचना मांडतों की', 'मा अशी चालना करतों कीं, अगर ‘मी असा ठराव मांडतों की, यापकी कोणते तरी एक वाक्य म्हणावे व नंतर संबंध ठराव वाचून दाखवावा. नर ‘हा ठराव सभेने मंजूर करावा असे म्हणावें. याप्रमाणे ठराव मांडावा व नंतर आपले भाषण करावे. पुष्कळ वेळां वक्ता आधी भाषण करतो व न