पान:सभाशास्त्र.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९ सभानियमन व संचालन २०० मौलिक हेतूविरुद्ध अगर तिच्या ध्येयाशी विसंगत नसावा; असत्य विधाने त्यांत नसावीत, तो बदनामीकारक अगर गुन्ह्याला उत्तेजन देणारा नसावा. कायद्याच्या मर्यादा राखणारा व सभ्यतेच्या मर्यादा न उल्लंघिणारा तो असावा. नियमानुसार तो नसेल अगर अन्य रीतीनें तो गैर अगर गैर शिस्त असेल तर तो मांडण्यास अध्यक्षाने परवानगी देऊ नये. त्याने योग्य दुरुस्ती सुचवावी व ती मांडणाराने मान्य केल्यास दुरुस्त ठराव मांडण्यास परवानगी द्यावी. सभेत होणारे कार्य व ठराव हे कायदेशीर आहेत, गैर नाहीत हे पाहण्याची जबाबदारी मुख्यत्वेकरून अध्यक्षावर आहे. सभासद भावनावश होऊन, द्वेषबुद्धीने, टिंगल करण्याचे हेतूने वाटेल ते सुचवितील; तथापि, त्यांचेवर नियमानुसार नियंत्रण घालणे हे अध्यक्षाचे काम आहे. हिंदूंच्या संस्थांनी कल्मा कसा म्हणावा अगर मुसलमानांच्या सभेनें विष्णुपूजा कशी करावी हे सांगण्याचा त्यांना अधिकार नाही व ते त्यांच्या कार्यक्षेत्रांतही येत नाहीं. यत्किचित् गोष्टीवर रागावून कायदेभंगाचा ठराव मांडणारेही जहाल सभासद असतात ! सभासदाची मावशी मेली म्हणून नगरपालिकेची सभा तहकूब करावा म्हणूनही ठराव येतो. हा अनुभव लक्षांत घेतां अध्यक्षाने संस्थेच्या प्रतिष्ठेचे दृष्टीनेही ठरावाबाबत दक्षता घेणे इष्ट ठरते. | ठरावाची चालनाः–ठराव पास होण्यापूर्वी ठरावाची स्थिति केवळ सूचनावजा असते. कारण अमुक अमुक व्हावें ही केवळ सूचना असते. सभेने ती स्वीकारली, मान्य केली म्हणजे ती ठराव या संज्ञेला पात्र होते. अमुक ठराव मांडला याचा अर्थ तो मजकूर सभेने स्वीकारावा अशी सूचना केली. सभेचे मत ‘ठरलें म्हणजे तो ठराव होतो. ठराव म्हणजे जे सिद्ध झाले, निश्चित झाले ते असा अर्थ समजणे योग्य आहे. प्राथामिक अवस्थेला चालना ( motion ) म्हणण्यास हरकत नाहीं. चालना करणे म्हणजे गति देणे. कार्यक्रम-पलिकेवर ठराव आहे पण कुणी तरी त्याला चालना दिली पाहिजे, कुणी तरी तो मांडला ( move ) पाहिजे, कार्यक्रमपत्रिकेवर अनेक उपसूचना असतील, अनेक विषय असतील पण कुणी तरी त्यांना चालना दिल्याशिवाय अगर ‘मांडल्याशिवाय ते चर्चेला येणार नाहीत. केवळ कार्यक्रम-पत्रिकेवर आहेत म्हणून त्यावर वादविवाद अगर चर्चा होणार नाहीं. कुणी तरी उभे राहून या विषयांचा विचार करावा अशी मी सूचना मांडतों अगर ‘या सभेचे असे मत आहे कीं,...हा ठराव मी मांडतों असें सभेपुढे येऊन म्हटले