पान:सभाशास्त्र.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशाख । ९८ मांडले पाहिजे व तें सभेने स्वीकारावे अशा सूचना मांडली म्हणजे चर्चा सुरू होऊन त्यावर सभेला आपले मत अगर निर्णय देता येतो. कार्यक्रमपत्रिकेतील जी बाब विचारांत घ्यावयाची असेल व ती ठरावच असेल तर प्रश्नच नाही. ती बाव मोघम विचारासाठी मांडली असेल तर तिला अनुरूप व प्रस्तुत असा ठराव सभेपुढे आला पाहिजे. नवीन कराबाबत विचार’, ‘राजकीय परिस्थितीचा विचार', * अन्नपरिस्थितीचा विचार’, ‘समितीच्या रिपोटचा विचार या सर्व मोघम बाबी होत. यांवर निश्चित मतप्रदर्शन करणारा ठराव सभेपुढे मांडला पाहिजे. नवीन कर सर्व तव्हेने विचार करतां गरिबांवर अन्यायकारक आहे असे या सभेचे मत आहे असा ठराव आला म्हणजेच चर्चेला सुरुवात होते. ‘विद्यमान राजकीय परिस्थितीत सरकारने आपले धोरण अमुक बाबतीत बदलले पाहिजे असे या सभेचे मत आहे, असा ठराव आला म्हणजे चर्चा सुरू होईल, उपसूचना येतील व शेवटी त्यावर सभेचे असे मत स्पष्ट होईल. पुष्कळ वेळां सभेपुढे हा विषय सभेने विचारात घ्यावा असा मोघम ठराव मांडून चर्चेला सुरवात होते. तथापि त्या चर्चेतून कांहीं तरी निश्चित निर्णय पाहिजे असेल तर अनुरूप अशी उपसूचना सभेपुढे आली पाहिजे. “जाइट पार्लमेंटरी कमिटीचा रिपोर्ट विचारांत घ्यावा' याला अनेक उपसूचना येऊ शकतात, ‘रिपोर्टाचा विचार करतां तो सर्वस्वी त्याज्य व अस्वीकार्य आहे असं या सभेचे मत आहे’, ‘रिपोटचा विचार करतां संरक्षक बंधने नसावीत व संयुक्त व्यवस्था नसावी असे या सभेचे मत आहे, या धर्तीवर अनेक उपसूचना येऊ शकतात. तात्पर्य उपसूचनेच्या अभावीं अनंत काल चर्चा करून केवळ ‘विचारांत घ्यावा' अशा ठरावाने सभेचे मत कळणार नाहीं. निश्चित ठरावरूपाने विषय सभेपुढे निर्णयार्थ आला पाहिजे. पुष्कळ वेळां सभेत दधिकाल, मोघम व प्रसंगी अनौपचारिक अशी चर्चा होते व शेवटीं निश्चित ठराव मांडण्यात येतो. तथापि संघाटित व नियमबद्ध संस्थेच्या सभेत हे होणे इष्ट नाही. कार्यकारी मंडळाने स्वतःचा म्हणून, निदान चर्चा सुलभ व्हावी म्हणून कांहीं तरी ठराव मांडणे योग्य आहे. | ठरावाचे स्वरूपः—जो ठराव चर्चेसाठी घ्यावयाचा असेल तो नियमानुसार असला पाहिजे. त्याची योग्य नोटीस असली पाहिजे, तो सभेच्या कार्यक्षेत्रांतील विषयासंबंधी असला पाहिजे. तो सभेच्या अगर संस्थेच्या