पान:सभाशास्त्र.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९७ सभानियमन व संचालन =

= =

पाहिजेत. त्यांत बदल करावयाचा असल्यास सभेची संमति पाहिजे, हजर सभासदांपैकी कोणालाही एखादी विशिष्ट बाब प्रथमःघ्यावी अशी सूचना मांडतां येते व तिला बहुमत मिळाल्यास ती बाब अध्यक्षाने प्रथम चर्चेला घालावी. कित्येक संस्थांतून एखाद्या बाबीला चर्चेत अग्रक्रम ( Priority or Preference ) मिळविण्यासाठी बहुसंख्याक सभासदांना लेखी यादी द्यावी लागते. तात्पर्य, अग्रक्रम मिळविण्यासाठी बहुमत पाहिजे, नाहीं तर कार्यक्रमपालकेंतील क्रमानुसार विषय मांडले जाणे योग्य आहे. कार्यक्रम-पत्रिका तयार करतांना विषयांचे महत्त्व जाणूनच ती तयार केली आहे असे मानणे जरूर आहे. ठराव पाहिजेः-सभेपुढे चर्चेचा विषय ठरावरूपाने आला पाहिजे. सभेचे मत अगर निर्णय सभेपुढील ठराव मताला घातल्याशिवाय सिद्ध होत नाहीं. सभेचे मत अगर निर्णय सिद्ध होण्यासाठी सभेपुढे स्पष्ट ठराव असला पाहिजे. निश्चित ठरावाशिवाय चर्चा होणे अयोग्य, अप्रस्तुत व विफल आहे. प्रश्न व उत्तरे यांतून निर्माण झालेल्या बाबींवर त्या सभेत चर्चा करता येणार नाहीं व ते योग्यही नाही. कारण सभासदांना चर्चेचा विषय आगाऊ कळला पाहिजे. चर्चा म्हणजे विविध मते व मने यांचा आविष्कार; पण तो व्यवस्थित व निर्णयात्मक होण्यासाठी, विषय निश्चितपणे सभेपुढे असला पाहिजे व चर्चेचा अंत समन्वित मतांत व्हावयाचा असेल तर सभेपुढे स्पष्ट ठराव असला पाहिजे. कुणी तरी विधान केले, त्यावर कांहीं चर्चा झाली अगर विषय मोघम ठेवून चर्चा झाली तरी जोपर्यंत ठरावरूपाने सभेचे मत जाहीर होत नाहीं तोपर्यंत सभेचे मत अमुक आहे असे कोणासही म्हणता येणार नाहीं. सभेचे मत अगर मार्गदर्शन ठरावरूपानेच व्यक्त होते. सभेचा निर्णय हवा असेल तर ती बाब ठरावरूपाने सभेपुढे आली पाहिजे. वृन्तान्तमंजुरी असो, नाममात्र मंजुरी असो, समितीच्या रिपोटाचा विचार असो तत्संबंधी प्रस्तुत असा ठराव मांडल्याशिवाय चर्चा नाही व निर्णयही नाहीं. पुष्कळ वेळां, कार्यकारीमंडळातर्फे खुलासे. अगर निवेदने मांडली जातात, प्रश्नाचे उत्तर देतांना पुष्कळ वेळां धोरणही जाहीर करण्यात येते. तथापि याही प्रसंगी त्यावर या वेळी चर्चा होऊ देणे योग्य नाहीं. सभेचे मत पाहिजे असल्यास रीतसर नोटीस देऊन ठराव आला पाहिजे. तात्पर्य, सभेपुढे येणा-या विषयाबाबत प्रस्ताव पाहिजे. कुणी तरी कांहीं तरी निश्चित मत स...७