पान:सभाशास्त्र.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९४ -सभाशास्त्र ।

wwwwwww संख्येबद्दल आक्षेप येतांच मोजणी करावी व गणसंख्या नसेल तर सभा तहकूब केली पाहिजे. मोजणी करण्यापूर्वी घंटा वाजवून अगर अन्य रीतीने आसपास रमणाच्या सभासदांना सभेत येण्याची सूचना देणे इष्ट असते; कारण ते उपस्थित झाल्याने सभाकार्य चालू राहते. तथापि तोपर्यंत जें कार्य झाले त्याला कांहीही न्यूनता येत नाहीं. तहकूबसभा नियम नसल्यास केव्हां भराव हे कार्यकारी मंडळ ठरवील, व त्या सभेची नोटीस दिली पाहिजे. गणसंख्या हजर ठेवून सभा सजविणे ( Make the House ) व गणसंख्या हजर ठेवून ती चालू ठेवणे (Keep the House ) ही कार्यकारी मंडळाचीं कर्तव्ये आहेत. विधिमंडळांत हे काम प्रतोदांचे (whip) असते. सभा सुरू करण्यास लागणारी गणसंख्या एक, पण सभेचा निर्णय कायदेशीर व्हावा म्हणून मतमोजणीसाठी किमान सभासदांची संख्या दुसरी, असाही एक प्रकार कांहीं ठिकाणी असते. इंग्लंडमधील उमरावसभेत (House of Lords) तीन सभासदांचे कोरम आहे. तीन, सभासद हजर असले म्हणजे काम सुरू होते, पण मतमोजणीने निर्णय घेण्याचा प्रसंग आल्यास ३० सभासद हजर असतील तरच तो प्रश्न निर्णित झाला असे मानतात; नाहीं तर सभा तहकूब करण्यात येते. तसेच विशिष्ट विषयांबाबत ठराव अंगर घटनात्मक ठराव पास व्हावयाचे असतील तर विशिष्ट संख्येने बहुमत मिळाले तरच ते पास होतील अशी व्यवस्था अनेक संस्थांतून असते. सदरील विषयाचा विचार करण्यासाठी जमलेल्या सभेत नुसत्या गणसंख्येने निर्णय घेतां येत नाहीं. गणसंख्या झाली म्हणजे काम सुरू होईल, चर्चा होईल, पण नियमाप्रमाणें मतमोजणीसाठीं सभासदांची विशिष्ट संख्या असल्याशिवाय सभेला कायदेशीर निर्णय घेता येणार नाहीं. उदाहरणार्थ एकंदर सभासदांपैकी, उपस्थित सभासदांपैकीं नव्हे ३ सभासदांनी मंजुरी दिल्याशिवाय अनेक बाबतींत नगरपालिकेला खर्च करता येत नाहीं. मंजुरीच्या ठरावाच्या वेळी नुसत्या गणसंख्येने कायदेशीर निर्णय घेतां येणार नाहीं. | कार्यक्रमपत्रिका (Agenda ):-गणसंख्या असलेल्या सभेत अध्यक्षानं स्थानापन्न होऊन प्रास्ताविक भाषण करून, प्राथमिक आक्षेपांचा निकाल दिल्यानंतर कार्यक्रम-पत्रिकेनुसार कामास सरुवात करावी. कार्यक्रम-पत्रिका ही कार्यकारी मंडळाने तयार करावयाची असते. (१) अध्यक्षाची नेमणूक (२) मागील सभेचे वृत्तांतवाचन (३) पत्रव्यवहार (४) समित्यांचे अगर