पान:सभाशास्त्र.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९५ सभानियमन व सचालन कार्यकर्त्यांचे रिपोर्ट (५) पैशाचा व्यवहार (६) ज्यांचा विचार व्हावयाचा आहे त्याबाबत ठराव (७) खास बाबी (८) किरकोळ (९) अध्यक्षाचे परवानगीने याप्रमाणें सामान्यतः बाबी असतात. । कार्यक्रम-पत्रिका तयार करतांना औपचारिक बाबी, केवळ मंजुरीच्या म्हणजे बिनविरोध बाबी, माहितीसाठी सभेपुढे ठेवण्याच्या बाबी प्रथम असाव्यात व नंतर महत्त्वाच्या व ज्यांवर वादविवाद होणार असेल त्या ठेवाव्यात. कार्यकारी मंडळाच्या बाबींनंतर व्यक्तिशः सभासदांनी धाडलेले विषय ठेवावेत. कार्यक्रम-पत्रिकेंत विषयांची साधारण कल्पना, यावी असा त्यांचा उल्लेख असावा. हा उल्लेख स्पष्ट, असंदिग्ध व सारांशरूपाने असणे इष्ट असते. कार्यक्रमपत्रिका अध्यक्षाचे सल्लयाने तयार करावी म्हणजे सभाकार्य सुकर होते. पुष्कळ वेळां सभासद माहिती मिळावी म्हणून प्रश्न विचारतात. कार्यक्रमपत्रिका योग्य रीतीने तयार केली असेल तर बरेच प्रश्न उपस्थित होत नाहींत. सभासदांना चर्चेत योग्य तव्हेने भाग घेता यावा यासाठी जी माहिती केवळ कार्यकारी मंडळ देऊ शकेल ती मिळविण्याचा हक्क सभासदाला आहे. ती माहिती सभासदाने मागितली असतां दिली पाहिजे. प्रश्नः—प्रश्नाचा उद्देश माहिती मिळविणे हाच असला पाहिजे, मतप्रदर्शन, मताचा अंदाज अगर टीकात्मक असे त्याचे स्वरूप नसावें. प्रश्नाने माहिती द्यावयाची नसून मिळवावयाची असते. त्यात बदनामीकारक अगर कांहीं गृहीत धरून धोरण जाणण्याचा उद्देश नसावा. वस्तुस्थितीची माहिती मिळवणे हेच प्रश्नाचे उद्दिष्ट आहे व असले पाहिजे. नियम असेल तर प्रश्नांची सूचना आगाऊ यावी, नाही तर ते सभेत विचारतां येतात, व अध्यक्षाने योग्य प्रश्नांची उत्तरे देण्यास कार्यकारी मंडळाला शक्यतों आज्ञापिले पाहिजे. प्रश्नांच्या उत्तरांतून माहितीला पूर्णता यावी या दृष्टीने प्रस्तुत असा उपप्रश्नही विचारण्यास हरकत नसावी. हे सर्व यथार्थ चर्चेसाठीं अवश्य आहे. सभासदांना माहिती मिळाली म्हणजे सभेत वातावरण चांगले राहते व चर्चेला योग्य वळण लागते. वृत्तान्तवाचनः—मागील सभेचा वृत्तान्त थोडक्यांत वर्णिलेला असावा. त्यांत मागील चर्चेचा सारांश व घेतलेले निर्णय, हजर सभासदांची नांवें अगर संख्या, मतनोंदणीचा उल्लेख, तसेच अन्य महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख ह्या